News18 Lokmat

आता काळी-पिवळी टॅक्सीही घरबसल्या करा बूक

मुंबईत काळी-पिवळी आणि कूल कॅब टॅक्सीचालकांनी 'आमची ड्राइव्ह' या मोबाइल अॅपची घोषणा केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2017 02:51 PM IST

आता काळी-पिवळी टॅक्सीही घरबसल्या करा बूक

29 एप्रिल : काळी पिवळी आता घरबसल्या बूक करता येणार आहे. ओला आण‌ि उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांनी न‌िर्माण केलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मुंबईत काळी-पिवळी आणि कूल कॅब टॅक्सीचालकांनी 'आमची ड्राइव्ह' या मोबाइल अॅपची घोषणा केली आहे.

१ जूनपासून ही सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या अॅपसाठी दोन संघटना एकत्र आल्या असून या सेवेसाठी प्रवाशांना प्रत्येक फेरीमागे सेवाशुल्क म्हणून पाच रुपये मोजावे लागणार आहेत.

या अॅपच्या मदतीने प्रवासी ओला आण‌ि उबेरप्रमाणेच काळी-पिवळी टॅक्सी आण‌ि कूल कॅब बूक करू शकतात. या सेवेत नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार असून अॅपमध्ये आपत्कालीन प्रसंगांसाठी पॅनिक बटणचीही सुविधा आहे. अॅपमध्ये एसी वा नॉन एसी टॅक्सी सेवेचा पर्याय स्वीकारल्यावर प्रवासी दरपत्रकही पाहू शकतात. त्याप्रकारे मार्ग निवडल्यानंतर प्रवाशांना एसएमएसद्वारे वन टाइम पासवर्ड दिला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2017 02:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...