मुंबईकरांना ख्रिसमसची भेट; 25 डिसेंबरपासून धावणार एसी लोकल

मुंबईकरांना ख्रिसमसची भेट; 25 डिसेंबरपासून धावणार एसी लोकल

नाही हो नाही हो म्हणत अखेर एसी लोकलसाठी मुहूर्त सापडला आहे. 25 डिसेंबरला ही एसी लोकल रुळांवर धावणार आहे.

  • Share this:

23 डिसेंबर : मुंबईकरांचं गारेगार लोकल प्रवासाचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. 25 डिसेंबरपासून पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान ही पहिली एसी लोकल सुरू होणार आहे. मुंबईकरांना पश्चिम रेल्वेनं ही ख्रिसमसची भेट दिलीये.

नाही हो नाही हो म्हणत अखेर एसी लोकलसाठी मुहूर्त सापडला आहे. 25 डिसेंबरला ही एसी लोकल रुळांवर धावणार आहे. नाताळ सणात लोकल सुरु होणार असल्याने तिकीटासाठी रेल्वेनं प्रवाशांना खास ऑफरही देण्यात आली आहे. रोजच्या गर्दीच्या प्रवासातून थोडासातरी दिलासा मिळेल असंच म्हणावं लागेल.

एसी लोकलसाठी साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक असे पास असणार आहेत. सध्याच्या फर्स्ट क्लासपेक्षा एसी लोकलचं प्रवास भाडं जास्त असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2017 07:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading