मुंबईतील कोस्टल रोडला केंद्राची अंतिम मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण खात्यानं ही परवानगी दिल्याची माहिती ट्विटरवर दिलीये.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 02:22 PM IST

मुंबईतील कोस्टल रोडला केंद्राची अंतिम मंजुरी

12 मे  : मुंबईतला महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला आवश्यक असलेली पर्यावरणाची अंतिम मंजुरी देण्यात आली. मुंबईच्या कोस्टल रोडसंदर्भातील सीआरझेडच्या अंतिम मंजुरीचा मसूदा पर्यावरण मंत्रालयाकडे सोपविण्यात आल्यानंतर त्याच्या मंजुरीची प्रक्रिया तातडीने करण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण खात्यानं ही परवानगी दिल्याची माहिती ट्विटरवर दिलीये. या मंजुरीमुळे मुंबईच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कोस्टल रोडच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करुन तात्काळ त्याचे काम सुरू करता येणार आहे.

यापूर्वीदेखील विविध अधिसूचना काढून कोस्टल रोडसाठीच्या वेगवेगळ्या परवानग्या देण्यात आल्या होत्या. ही त्यातील अंतिम परवानगी आहे. या सागरी किनारा मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. गेली अनेक वर्षे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम विविध परवानग्यांअभावी रखडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...