मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Rain Update : मुंबईकरांची पाणी कपातीतून होणार सुटका, धरणांच्या पाणी पातळीत वाढ

Mumbai Rain Update : मुंबईकरांची पाणी कपातीतून होणार सुटका, धरणांच्या पाणी पातळीत वाढ

 जून महिन्यात पाऊस (Mumbai rain update) झाला नसल्याने राज्यातील कित्येक प्रमुख शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई भासू लागली होती. (Mumbai water crisis)

जून महिन्यात पाऊस (Mumbai rain update) झाला नसल्याने राज्यातील कित्येक प्रमुख शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई भासू लागली होती. (Mumbai water crisis)

जून महिन्यात पाऊस (Mumbai rain update) झाला नसल्याने राज्यातील कित्येक प्रमुख शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई भासू लागली होती. (Mumbai water crisis)

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 10 जुलै : जून महिन्यात पाऊस (Mumbai rain update) झाला नसल्याने राज्यातील कित्येक प्रमुख शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई भासू लागली होती. (Mumbai water crisis) दरम्यान मुंबई, पुणे, साताऱ्यासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईमुळे कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे मुंबई आणि पुण्यातील लोकांना याचा मोठा फटका बसणार होता. (pune & Mumbai water crisis) परंतु मागच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने तुर्तास तरी मुंबई आणि पुणेकरांवरील पाणी कपाती टळली आहे. पुरेसा पाऊस झाल्याने धरणांमध्ये (Mumbai pune dam water level hike)  मुबलक पाणीसाठी उपलब्ध झाला आहे.

भातसा, तानसा, वैतरणा, मोडकसागर ही धरणे मुंबईला पाणीपुरवठा करतात या क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पाण्याची पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मागीलवर्षा पेक्षा यंदाच्यावर्षी पाऊसाची सुरवात जरी उशीरा झाली असली तरीही मागीलवर्षा पेक्षा सर्व धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिकेची पाणी कपातीतून सुटका झाली आहे.

हे ही वाचा : आषाढी एकादशीदिवशी पुणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीचा निर्णय मागे

मुंबई आणि उपनगरात मागील पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची पावसाअभावी रखडलेल्या शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. मुंबई आणि उपनगरातील अनेक भागातील पाणवठे भरलेली आहेत. जून महिन्यात पाऊस कमी झाल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. मुंबई महानगरपालिकेने काही क्षेत्रात पाणी कपात सुरू केली होती. मात्र जुलैच्या 2 तारखेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा, मोडकसागर धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.

भातसा धरणाच्या सध्या पाण्याची पातळी 122.50 मीटर असून मागीलवर्षी ती 114.58 मीटर होती, आज रोजी भातसा धरणाचा एकूण पाणीसाठा 519.734 दशलक्ष घन मीटर असून, मागीलवर्षी तो कमी होता. तर धरण क्षेत्रात आजचा पाऊस 127 मिलीमीटर झाला असून आजपर्यंतचा एकूण पाऊस 1053 मिलीमीटर एवढा झाला आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली असून आजमितीस धरणाची पाणी पातळी 598.11 मीटर असून धरण क्षेत्रात 2700 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणात एकूण पाणीसाठा 166.79 दशलक्ष घन मीटर आहे.

हे ही वाचा : शिवसेनेवर कुणाचा हक्क?, दोन्ही गटाच्या आमदारांना मिळाली नवी नोटीस

तानसा धरणाची संपूर्ण भरून वाहण्याची क्षमता 421 .96 मीटर असून आजरोजी तानसा धरणाची पाण्याची पातळी 121.478 मीटर असून धरणात एकूण 65.58 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. आतापर्यंत तानसा धरणात 681.00 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

First published:

Tags: Monsoon, Mumbai rain, Rainfall, Weather forecast, Weather update

पुढील बातम्या