S M L

सावधान! मुंबई आजारी पडलीये

प्रजा फाऊंडेशनच्या माहिती अधिकारातून आलेल्या माहितीत मुंबईचं धक्कादायक वास्तव समोर आलंय

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2018 10:17 AM IST

सावधान! मुंबई आजारी पडलीये

स्वाती लोखंडे, मुंबई, ०७ सप्टेंबर- मुंबई आजारी पडलीये. आम्ही असं म्हणतोय कारण प्रजा फाऊंडेशनच्या माहिती अधिकारातून आलेल्या माहितीत धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत आजार बळावलेत. खरंतर गेल्या ५ वर्षांत टीबी निर्मुलनासाठी पालिकेने कोट्यवधी खर्च केले, पण रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढल्याचंच समोर आलं आहे. डेंग्यू आणि मलेरियाने लाखांची आकडेवारी पार केलीये. प्रजा फाऊंडेशनने सादर केलेल्या अहवालानुसार मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते तरीसुद्धा महापलिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग कुचकामी कामगिरी बजावताना दिसत असल्याचं अहवालात समोर आलं आहे.

प्रजा फाऊंडेशनने आरटीआयच्या साह्याने आरोग्य विभागाची जमा केलेली माहिती

टीबीची प्रकरणे २०१३-१४ मध्ये ३३ टक्क्यांनी वाढून ती ४१,४७९ वरून २०१७ मध्ये ५५, १३० झालीपाच वर्षांत डेंग्यूच्या प्रकरणात ९८ टक्के वाढ झाली असून ७, २६१ वरून १४, ३४५ वर गेली.

२०१८ मध्ये पालिकेच्या रुग्णालयात ३५ टक्के चिकित्साकर्मीची कमतरता, तर राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये ५९ टक्के तुटवडा

डेंग्यूची अंदाजे प्रकरणे १, २१, ७७५ तर मलेरियाची १, १५, २६८

Loading...
Loading...

मुंबईत ७६ टक्के घरामध्ये कोणाचाही विमा उतरविण्यात आला नाही.

प्रजाने मुंबईच्या विविध भागात  २०, ०७८ घरांमध्ये जाऊन हा सर्वे केला आहे.

प्रजा फाऊंडेशनचा मुंबईचा आरोग्यविषयक अहवाल

- मुंबईत टीबी रुग्णांची संख्या गेल्या चार वर्षांत ३३ टक्क्यांनी वाढली. २०१३-१४ ला ४१, ४७९ रूग्ण होते, २०१७-१८ ला टीबी रूग्णसंख्या ५५, १३० वर गेलीय

- कुर्ला, सांताक्रूझ आणि भांडूप परिसरात टीबीचे सर्वाधिक रूग्ण

- गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रूग्णसंख्येत ९८ टक्क्यांनी वाढ झाली असून रूग्णसंख्या ७, ६२१ वरून १४, ३४५ वर गेलीय

- बीएमसी रूग्णालयांमध्ये ३५ टक्के डॉक्टरांची तर राज्य सरकारच्या रूग्णालयात ५९ टक्के डॉक्टरांची कमतरता

- मुंबईकरांचा एकूण उत्पन्नाच्या ९ टक्के हिस्सा उपचारांवर खर्च होतो

- ७६ टक्के लोकांनी आरोग्य विमा घेतलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 10:17 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close