Home /News /mumbai /

weather update : मुंबईकरांना मान्सूनपूर्व पावसाचा दिलासा, तर 'या' तारखेला मुसळधार पावसाचा IMD चा इशारा

weather update : मुंबईकरांना मान्सूनपूर्व पावसाचा दिलासा, तर 'या' तारखेला मुसळधार पावसाचा IMD चा इशारा

मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्यासरी पडल्या. दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार (imd alert) वातावरण थंड राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  मुंबई, 22 मे : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सून पूर्व (mumbai pre monsoon rain) पावसांने थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्यासरी पडल्या. दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार (imd alert) वातावरण थंड राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचबरोबर मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात धडकणार आहे. तर 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे यामुळे मुंबई करांना यंदा मान्सूनचा लवकरच आनंद घेता येणार आहे. (weather update)

  वर्षाला मान्सून मुंबईत 10 जूनपर्यंत दाखल होतो. यंदा मात्र मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. दरम्यान मान्सूनच्या प्रवास योग्य दिशेने सुरू असल्याने 3 ते 9 जूनदरम्यान मान्सूनचे राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पाऊस बरसेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

  हे ही वाचा : इगतपुरीत भीषण पाणी टंचाई; जीव धोक्यात घालूनही मिळतंय गढूळ-दुर्गंधीयुक्त पाणी

  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा अगोदर २२ मे ऐवजी १५ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. आता केरळमध्ये २७ मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत ५ ते ६ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे 20 ते 22 मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे दरम्यान हा पाऊस कदाचीत हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस असल्याने कदाचित हा पाऊस थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस नाही लागल्यास पेरणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान होते. यासाठी आज कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहनही केले.

  तर दुसरीकडे देशात उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांत पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिणेकडील केरळ आणि तमिळनाडूमध्ये काही भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Weather, Weather forecast, Weather update

  पुढील बातम्या