भेंडी बाजार इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 33 वर

भेंडी बाजार इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 33 वर

चंद्रकांत पाटलांंनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.तसंच जखमींचा खर्च राज्य सरकार उचलणार आहेत असंही पाटीलांनी सांगितलं.

  • Share this:

31 ऑगस्ट: मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये हुसैनी इमारत कोसळल्यानं 34 जणांचा मृत्यू झालाय. 117 वर्षांपूर्वीची ही इमारत होती. यामध्ये 15 जण जखमी झालेत, त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

15 जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या 2 जवानांचा समावेश आहे.

...आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मुंबईतल्याच नव्हे तर कदाचित देशतल्या सर्वाधिक दाटीवाटीच्या इलाक्यात गुरुवारी सकाळी हुसैनी बिल्डिंग पडली. भेंडी बाजारच्या पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनी नावाची ही इमारत आहे. या इमारतीत 5 कुटुंबं राहत होती.

हुसैनीच्या कोसळण्यानं अनेकांनी आप्त गमावले, त्यांचा अंतिम आकडा अद्याप हलता आहे. या दुर्घटनेत अनेकांचा काडीकाडीनं जोडलेला संसार मोडून पडला.

पण, ही दुर्घटना अनपेक्षित नव्हती हेच कठोर सत्य आहे. 2011 साली हुसैनी इमारतीची गणना धोकादायक इमारतीत झाली आणि तिथले लोक मात्र घर सोडून जायला तयार नव्हते.

मुंबईत धोकादायक इमारतींचा आकडा वर्षागणिक वाढतोय. पुनर्वसनाची ठोस शाश्वती नसल्याने रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत आणि काळ त्यांच्या उंबरठ्यावर उभा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading