मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत 'स्पेशल 26', ईडीच्या 'फेक' अधिकाऱ्यांचा व्यापाऱ्याला पावणे दोन कोटींचा चुना!

मुंबईत 'स्पेशल 26', ईडीच्या 'फेक' अधिकाऱ्यांचा व्यापाऱ्याला पावणे दोन कोटींचा चुना!

दहा वर्षांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या स्पेशल छब्बीस या सिनेमाच्या कथेप्रमाणे सोमवारी मुंबईत एक घटना घडली आहे. झवेरी बाजारातल्या सराफा दुकानात बोगस ईडी अधिकाऱ्यांनी डल्ला मारला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 जानेवारी : स्पेशल छब्बीस हा सिनेमा बराच गाजला होता. तोतया सीबीआय आणि आयकर अधिकारी बनून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्यांची ती कहाणी होती. मात्र मुंबईत त्याच पद्धतीनं एका चौकडीनं सराफाला गंडा घातला होता. पण अवघ्या २४ तासांत पोलिसांनी त्या तोतया ईडी अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केलाय.

दहा वर्षांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या स्पेशल छब्बीस या सिनेमाच्या कथेप्रमाणे सोमवारी मुंबईत एक घटना घडली आहे. स्पेशल छब्बिसमध्ये अभिनेता अक्षय कुमार कधी बनावट सीबीआय तर कधी आयकर अधिकारी बनून व्यापाऱ्यांना गंडवतो. त्याच पद्धतीनं मुंबईत एका सराफाला आरोपींनी भर दिवसा गंडा घातलाय.

23 जानेवारी 2023 ला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झवेरी बाजारातल्या सराफा दुकानात या बोगस ईडी अधिकाऱ्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेचं सीसीटीव्हीदेखील समोर आलं आहे.

तिथं दहशत निर्माण व्हावी म्हणून त्या तोतया ईडी अधिकाऱ्यांनी सराफाच्या एका कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यांनी 3 किलो सोनं आणि 25 लाखांची रोकड असा 1 कोटी 70 लाखांचा ऐवज लंपास केला. यातलं अडीच किलो सोनं आणि 15 लाख रुपये रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

तो सगळा ऐवज घेऊन ते तोतया ईडी अधिकारी निवांतपणे तिथून निघून गेले.या घटनेनंतर सराफा व्यापाऱ्याला संशय आला आणि त्यानं पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने मोहम्मद फजल, मोहम्मद रजीक आणि विशाखा मुदले या तिघांना जेरबंद केलं आहे.

आज सगळीकडचं ईडीचा मोठा बोलबाला आहे. राजकारणात त्याची मोठी चर्चा आहे. आणि त्याचाच गैरफायदा घेत ही लुट करण्यात आली होती. मात्र या घटनेमुळे सराफ व्यापऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

First published: