धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 23 मे : अन्न, वस्त्र, निवारा इतकीच शिक्षण ही देखील मुलभूत गरज आहे. जगातिक स्पर्धेत टिकाव धरायचा असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. पण, हेच शिक्षण दिवसोंदिवस महाग होतंय. सर्वसामान्य तसंच गरीब कुटुंबांच्या पालकांना शिक्षणाचा खर्च उचलणं अवघड जातं. त्यानंतरही अनेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी काटकसरीनं पैसा जमा करून खर्च करतात. या पालकांच्या खर्चाचं ओझं कमी करण्याचं काम मुंबईतील एक चळवळ करत आहे.
काय आहे उपक्रम?
मुंबईमध्ये'आयडियल एज्युकेशन मुव्हमेंट’ ही शैक्षणिक चळवळ गेल्या 19 वर्षांपासून कार्यरत आहे. या अंतर्गत उर्दू भाषेत 8 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी दिली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांकडून परतीच्या तरतूदीसह 500 रुपयांची अनामत रक्कम घेतली जाते. खासगी शिकवणीची भरमसाठ फिस भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना 'आयडियल'चा मोठा फायदा होतोय. त्यांची आता मुंबईत 10 पेक्षा जास्त केंद्र आहेत. त्यामध्ये उच्च शिक्षित आणि तज्ज्ञ शिक्षक मुलांना मार्गदर्शन करतात.
गोवंडीमध्ये गेल्या वर्षीच या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. या केंद्रात 200 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. शिक्षणात हुशार असून केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही मुलाचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही काम करतो. गोवंडीत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. त्यामधील नागरिक हे मजुरी किंवा लहान-मोठी कामं करतात. त्यांची मुलं अभ्यासात हुशार असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, अशी माहिती या चळवळीचे संस्थापक उस्मानी तन्वीर यांनी दिली.
अभंग कधी असा ऐकला का? मुंबईकर तरूणांचा हटके रॅाक बॅण्ड ग्रुप, पाहा हा VIDEO
'गोवंडीमध्ये या चळवळीला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका होती,. पण आता याच परिसरात आणखी एक शाखा सुरू करण्याचा आमचा विचार आहे. सर्वांना समान ज्ञान आणि समान शिक्षण मिळवून देणे हा मोफत शिक्षणाचा उद्देश आहे. असंख्य विद्यार्थ्यांना या उपक्रमाची आवश्यकता आहे, असं येथील शिक्षक आझमी शेख यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.