नियम मोडला म्हणून अडवलं, महिलेनं कॉलर पकडून वाहतूक पोलिसावर उगारला हात; VIDEO आला समोर

नियम मोडला म्हणून अडवलं, महिलेनं कॉलर पकडून वाहतूक पोलिसावर उगारला हात; VIDEO आला समोर

वाहतूक पोलिसाने या महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप मारहाण करणाऱ्या महिलेनं केला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : मुंबई वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून त्याच्यावर हात उचलणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐन नवरात्र उत्सवात हा व्हिडीओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. ही महिला पोलिसाची कॉलर पकडून त्याला बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी स्थानिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेत व्हिडीओ व्हायरल केला.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईतील काळबादेवी परिसरात घडली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने या हवालदाराने अडवले आणि त्यांना विचारणा केली. महिलेनं आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीनं उडवा-उडवीची उत्तर देत गोंधळ केला. वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान तिथे असलेल्या पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.

हे वाचा-माता न तू वैरिणी...ऑललाईन वर्गात उत्तर दिलं नाही म्हणून आईने मुलीला भोसकलं

वाहतूक पोलिसाने या महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप मारहाण करणाऱ्या महिलेनं केला आहे. त्यामुळे संतापाच्या भरात या महिलेनं वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केली. मोहसीन निजामउददीन खान या महिलेला पोलिसांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या महिलाला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान काळबादेवी परिसरात 24 तास पोलीस असतानाही असा प्रकार खरंच घडला असेल तर तक्रार करण्याऐवजी दादागिरी दाखवून वाहतूक पोलिसांवर हात उचलण्यापेक्षा पोलिसात तक्रार करणं अपेक्षित होतं. मात्र महिलेनं वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 24, 2020, 2:40 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या