मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाकरे Vs फडणवीस, अधिवेशनात 'या' मुद्द्यांवरून रंगणार जोरदार सामना

ठाकरे Vs फडणवीस, अधिवेशनात 'या' मुद्द्यांवरून रंगणार जोरदार सामना

या अधिवेशनात सत्ताधारी नेत्यांना पुरवण्या मागण्या आणि महत्त्वाची काही विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत.

या अधिवेशनात सत्ताधारी नेत्यांना पुरवण्या मागण्या आणि महत्त्वाची काही विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत.

या अधिवेशनात सत्ताधारी नेत्यांना पुरवण्या मागण्या आणि महत्त्वाची काही विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत.

मुंबई, 13 डिसेंबर : मुंबईत सोमवारपासून दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अवघ्या दोन दिवसाच्या या अधिवेशनात सत्ताधारी नेत्यांना पुरवण्या मागण्या आणि महत्त्वाची काही विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत. तर दुसरीकडे विरोधकांना राज्यातील काही महत्त्वाच्या विषयावर आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी करायची आहे.  राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. अधिवेशन पुढील काही मुद्द्यांवर गाजणार दोन दिवसाच्या अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते राज्यातील काही मुद्द्यांवर आक्रमक होत सत्ताधारी नेत्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. राज्यात झालेला अवकाळी मुसळधार पाऊस... त्यात पीक नुकसान अद्यापही अनेकांना मिळाले नाही. यावरून विरोधक आक्रमक होणार आहेत. तसंच कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप असणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्नही अजून सुटलेला नाही. यावरून विरोधक आक्रमक पवित्रा घेतील. तसंच ओबीसींच्या मुद्द्यावरही सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यात कायदा व सुव्यवस्था, महिला अत्याचार बलात्कार या घटनांवरून सुद्धा सरकारवर विरोध पक्षातील नेते निशाणा साधतील. महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने नुकताच कॅबिनेटमध्ये मंजूर केलेला शक्ती कायदा यासह काही महत्त्वाच्या विधेयकांना या अधिवेशनात मंजुरी मिळेल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गेल्या काही महिन्यात विधानसभा आणि परिषद यांचे आजी-माजी सदस्यांचं निधन झाले आहे. त्यावर शोक प्रस्ताव देखील मांडला जाईल. दोन दिवसाचा अधिवेशनात तारांकित लक्षवेधी असे कोणतेही प्रश्न असणार नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची कोंडी कमी होणार आहे. सत्ताधारी पक्ष महत्त्वाची विधेयक तसेच पुरवण्या मागण्या मंजूर करण्यासाठी आग्रही राहतील, अशी शक्यता आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Devendra Fadnavis, Uddhav Thackeray (Politician), Winter session

पुढील बातम्या