• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Corona Lockdown: नागपूर, पुणं किंचित सैलावलं; पण मुंबईत 'जैसे थे'

Corona Lockdown: नागपूर, पुणं किंचित सैलावलं; पण मुंबईत 'जैसे थे'

BMC issues fres orders: मुंबई महानगरपालिकेने ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले गेल्या आठवड्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:
मुंबई, 11 जून : महाराष्ट्र सरकारने कोरोना (Corona) निर्बंध शिथिल (restrictions relaxation) करण्याच्या संदर्भात एकूण पाच टप्पे तयार केले आहेत. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर पाहून स्थानिक स्थरावर आणि जिल्हा पातळीवरील निर्बंध हटवण्यात येत आहेत. नागपूर (Nagpur) आणि पुणे शहरातील निर्बंध शिथिल (restrictions relaxation in Pune) करण्यात आले असताना मुंबईकरांना (Mumbai) मात्र, अद्याप निर्बंधातून सूट मिळताना दिसत नाहीये. मुंबई महानगरपालिकेने (BMC) यापूर्वी लागू केलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. मुंबई मनपाने जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, बृहन्मुंबई हद्दीत कोविड 19 चा पॉझिटिव्हिटी दर 4.40 टक्के असून ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर 27.12 टक्के इतका आहे. मात्र, मुंबई शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, मुंबई महानगर प्रदेशातून लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करून मोठ्या संख्येने मुंबईत येणारे प्रवासी तसेच मुंबई शहर परिसरात येत्या काही दिवसांत दिलेला अतिवृष्टीचा इशारा या गोष्टी लक्षात घेता कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई मनपा हद्दीत लेवल 3 चे निर्बंधांबाबत 5 जून 2021 रोजी जारी केलेले नियम पुढील आदेशापर्यंत जसेच्या तसे लागू असणार आहेत. शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर उपायजोयना अनिवार्य राहतील. नवे आदेश सोमवार 14 जून 2021 पासून लागू होतील असेही आदेशात म्हटलं आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या मोठी; अनलॉकमुळे रुग्णवाढ? पुण्यातील निर्बंध आणखी शिथिल  कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. आता पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या या पाच स्तरांनुसार कोरोना संसर्गचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत असल्यास निर्बंध शिथिल करण्यात येतील. पुण्यातील दुकाने आता संध्याकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहेत. 50 टक्के क्षमतेने ही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी. हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यासिका, ग्रंथालये 50 टक्के उपस्थितीत सुरू होणार आहेत. मॉल सुद्दा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सिनेमा, नाट्यगृह बंद राहणार आहेत.
Published by:Sunil Desale
First published: