रविवारी पश्चिम रेल्वेवर जंबो मेगाब्लॉक, असं असेल Time Table

रविवारी पश्चिम रेल्वेवर जंबो मेगाब्लॉक, असं असेल Time Table

मरिन लाईन्स ते माहिम दरम्यान 5 तासांचा हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.35 ते 3.35 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना वेळेचं नियोजन करावं लगणार आहे.

  • Share this:

मुंबई 12 जुलै : येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने आज ही घोषणा केली असून त्या दिवशी गाड्यांचं वेळापत्रकातही मोठे बदल करण्यात आलेत. मरिन लाईन्स ते माहिम दरम्यान 5 तासांचा हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.35 ते 3.35 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना वेळेचं नियोजन करावं लगणार आहे.

पश्चिम रेल्वेचा 5 तासांचा जंबो ब्लॉक असेल. मारिन लाईन्स ते माहीम स्टेशन दरम्यान रविवारी  हा 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या दरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल.त्यामुळे मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान बोरीवलीच्या दिशेने जाणारी धीमी वाहतूक जलद ट्रॅकवर वळवली जाणार आहे.

तर बोरिवली कडे जाणाऱ्या धीम्या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा या स्थानकावर थांबणार नाहीत, कारण तिथे जलद ट्रकच्या बाजूला प्लॅटफॉर्म नाही. या ब्लॉक दरम्यान अनेक जलद आणि धीम्या गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. या ब्लॉक दरम्यान लोअर परेल आणि माहीम स्थानकावर गाडी दोनदा थांबेल. ट्रॅक, सिग्नल आणि विद्युतवाहिनी यंत्रणेध्ये या ब्लॉक दरम्यान काम केलं जाणार आहे.

VIDEO: धक्कादायक! कारागृहात चालवला जातोय जुगार अड्डा

सिडकोची घरांची बंपर लॉटरी

मुंबईत घरं घेणं म्हणजे स्वप्न असतं. सर्व सामान्यांना मुंबईत घर घेणं परवडत नाही. त्यामुळे सिडको आणि म्हाडा घरांसाठी लॉटरी काढत असतात. ऑगस्ट महिन्यात सिडको घरांसाठी लॉटरी काढणार असून ही लॉटरी तब्बल 86 हजार 700 घरांची लॉटरी निघणार आहे. याचा आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना फायदा होणार आहे.

Zomato डिलीव्हरी बॉयला रॉडने बेदम मारहाण, हॉटेल मालकाचा VIDEO व्हायरल

सिडको येत्या पाच वर्षात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. त्यातल्या 86 हजार 700 घरांची सोडत ऑगस्टमध्ये काढण्यात येणार आहे. या सोडतीचं नियोजन पूर्ण झालंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच अल्प उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून देत आहे.

त्यामुळे नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होणार असून सर्वसामान्यांचे घरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. या घरांमुळे नवी मुंबई मधील बिल्डर लॉबीलाही मोठा फायदा होणार आहे. सिडकोच्या वेबसाईटवर याचा फॉर्म उपलब्ध होणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

VIDEO: जगण्यासाठी केविलवाणी धडपड; बिबट्याची मृत्यूशी झुंज कॅमेऱ्यात कैद

मागच्या 47 वर्षात सिडकोने केवळ 30 हजार घरे बांधली होती. मात्र लोकसभा निवडणुकीआधी नवी मुंबईत सिडको 90 हजार घरे बांधणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. या महागृहनिर्मितीची सोडत ऑगस्ट मध्ये काढण्यात येणार आहे. यात 53 हजार घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर 38 हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणार आहेत. यातील 35 टक्के घरे ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत राखीव असणार आहेत. सध्या 86 हजार 700 घरांची सोडत काढण्यात येणार असून इतर घरांची सोडत लवकरच होणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 05:06 PM IST

ताज्या बातम्या