मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे; मुंबईसह या भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे; मुंबईसह या भागांत मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा भागात तसंच मुंबईत येत्या 24 तासांत अतिवृष्टी (Heavy Rain in Mumbai) होण्याची शक्यता आहे

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा भागात तसंच मुंबईत येत्या 24 तासांत अतिवृष्टी (Heavy Rain in Mumbai) होण्याची शक्यता आहे

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा भागात तसंच मुंबईत येत्या 24 तासांत अतिवृष्टी (Heavy Rain in Mumbai) होण्याची शक्यता आहे

मुंबई 29 सप्टेंबर : भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी सांगितलं की, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे दक्षिण पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain in Bengal) शक्यता आहे. विभागाने मंगळवार आणि बुधवारी या भागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस किंवा विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण कोलकातामधील (Kolkata) भवानीपूर विधानसभेची पोटनिवडणूक गुरुवारी होणार आहे. इथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) निवडणूक लढवत आहेत.

किनारपट्टीवर चक्रीवादळाचा रुद्रावतार; पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने शहरे आणि शहरांच्या सखल भागात पाणी साचण्याची आणि पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. सोबतच मच्छीमारांना गुरुवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला. प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक जी के दास म्हणाले, "पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे आणि उत्तर 24 परगणा, हावडा आणि हुगली जिल्ह्यांच्या काही भागात पाऊस होईल.

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा भागात तसंच मुंबईत येत्या 24 तासांत अतिवृष्टी (Heavy Rain in Mumbai) होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली. आयएमडी मुंबईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस होसाळीकर (K S Hosalikar) म्हणाले, “गुलाब चक्रीवादळाचा (Gulab Cyclone) उर्वरित प्रभाव मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात कायम राहील आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात बुधवारी अधिक पाऊस पडेल.

Cyclone Gulab: आज किनारपट्टीला धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, दोन राज्यात रेड अलर्ट

अत्यंत मुसळधार पाऊस म्हणजे 24 तासात 204.5 मिमी पेक्षा जास्त पाऊस होणं. ते म्हणाले, “गुलाब चक्रीवादळाचे आता कमी दाबाचे क्षेत्र आहे. याची अरबी समुद्राच्या दिशेने वाटचाल होताच, गुरुवारपासून महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव कमी होईल.

First published:
top videos

    Tags: Rain updates, Weather forecast