मुंबई आणि उपनगात पावसाने खरोखरंच हजेरी लावली. मुंबई, उपनगर, ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पनवेल (Panvel) या विभागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली.#Monsoon has arrived in Mumbai today, normal arrival date is 10th June every year so it has arrived prior to the average arrival date: Dr Jayanta Sarkar, Deputy Director General (DDG), IMD Mumbai
— ANI (@ANI) June 9, 2021
ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागात पहाटे पासून रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. येत्या 4 दिवस कोकण, ठाणे आणि इतर जिल्ह्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका आणि पालिक प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.#WATCH | Maharashtra: Vehicles wade through water at Gandhi Market in Mumbai, following heavy rainfall. #Monsoon has arrived in Mumbai today. pic.twitter.com/t2njvLfkco
— ANI (@ANI) June 9, 2021
वसई विरारसह ग्रामीण भागातील आणि किनारपट्टीच्या गावातील सर्व लोकांना तलाठी, सर्कल ऑफिसरमार्फत अलर्ट केलं आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली तर शाळा , सार्वजनिक इमारत या ठिकाणी पूरग्रस्त लोंकाची सोय करण्यात आली आहे.#WATCH | Maharashtra: Streets get waterlogged as Mumbai receives heavy rainfall. Visuals from Sion. #Monsoon has arrived in Mumbai today. pic.twitter.com/1q3l5qMvuv
— ANI (@ANI) June 9, 2021
रेल्वेकडून अलर्ट जारी मुंबईत मुसळधार पाऊस दाखल होताच रेल्वेनं सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व मदत गाड्या आणि कर्मचार्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. जोरदार पावसामुळे रुळावर पाणी साचण्याची परिस्थिती उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी आणि स्थानिक सेवा सुरळीत चालविण्यासाठी सतर्क राहण्यास सांगण्यात आले.Mumbai & aroubd areas recd wide spread hvy rains in last 24hrs seen here in fig2; Belapur 150mm+.Latest satellite image looks vry promising with dense cloudings ovr west coast with Mumbai,Thane too.Hvy RF warnings r already issued ovr west coast by IMD. आजMumbai 🌧Onset could be! pic.twitter.com/mA1wYMflpu
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 9, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.