S M L

मुंबईकरांनो, आता तुमचं पाणीही महागलं ! अशी आहे दरवाढ

दरम्यान, मुंबई महापालिकने मुंबईकरांच्या पाण्यावर ३.७२% दरवाढ केलीय. दरवर्षी पावसाळ्यानंतर पाण्यावर दरवाढ केली जाते. मात्र...

Renuka Dhaybar | Updated On: Jun 15, 2018 07:44 AM IST

मुंबईकरांनो, आता तुमचं पाणीही महागलं ! अशी आहे दरवाढ

मुंबई, 15 जून : वाढत्या महागाईमुळे हैराण मुंबईकरांना आता आणखी मनस्ताप होणार आहे. कारण आजपासून मुंबईच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. रहिवासी इमारतींमध्ये राहणाऱ्यांना दर 1000 लीटरमागे आता 18 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. तर झोपडपड्डीत राहणाऱ्यांसाठी ही वाढ 14 पैसे इतकी आहे.

महापालिकेच्या या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खर्चात आणखी वाढ होणार इतकं नक्की. आधीच वाढलेली महागाई आणि त्यात पाणी ही महागल्यामुळे मुंबईकर संताप व्यक्त करतायेत.

या दरवाढीमुळे पालिकेच्या तिजोरीत 41 कोटी 33 लाखांची भर पडणार आहे. 2014, 2016 आणि 2017मध्ये पाण्याच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. 2012च्या एका ठरावानुसार बीएमसी दरवर्षी दरवाढ करू शकतं, फक्त दरवाढीची टक्केवारी 8 पेक्षा कमी हवी. याच नियमाच्या आधारावर यंदा महापालिकेनं पाण्याच्या दरात वाढ केली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकने मुंबईकरांच्या पाण्यावर ३.७२% दरवाढ केलीय. दरवर्षी पावसाळ्यानंतर पाण्यावर दरवाढ केली जाते. मात्र यावर्षी पावसाळ्यापूर्वीच पाण्याचे दर वाढवलेत.

ही दरवाढ २०१२ साली सुचवलेल्या सुचनांप्रमाणे केली असून महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात सुचना आज स्थायी समितीमध्ये मांडली. ही पाण्याची दरवाढ दिनांक १६ जून पासून लागू करण्यात येणार आहे.

Loading...
Loading...

अशी आहे दरवाढ

प्रकार                                        जुने दर                    नवे दर(रुपये)

दर प्रति हजार क्विटल

घरगुती                                        3.68                         3.82

झोपड्या, आदिवासी पाडे            4.08                        4.23

इतर घरगुती ग्राहक                     4.91                         5.09

अव्यावसायिक संस्था                   19.67                      20.40

व्यावसायिक संस्था                      36.88                     38.25

उद्योग, कारखाने इ.                     49.16                     50.99

रेसकोर्स, हॉटेल्स                          73.75                     76.49

शीतपेये, बाटलीबंद उत्पादक      102.44                  106.25

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 07:44 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close