Home /News /mumbai /

मुंबईतील 'या' भागात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त; का आणि कसा वाढतोय मुंबईचा धोका?

मुंबईतील 'या' भागात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त; का आणि कसा वाढतोय मुंबईचा धोका?

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत (mumbai) आहेत.

मुंबई, 28 मे : देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण (corona patient) महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत (mumbai) आहेत. बुधवारी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 835 वर पोहोचली. मुंबईतील वॉर्डचा (ward) विचार करता सर्वाधिक कोरोना रुग्ण जी-उत्तर वॉर्डमध्ये आहेत. हा वॉर्ड म्हणजे धारावीचा परिसर. मुंबईत गेल्या सात दिवसांत कोरोनाव्हारसची नवीन प्रकरणं दररोज सरासरी 5.17 टक्क्यांनी वाढत आहेत. माहीम, धारावी आणि दादर परिसरात तब्बल 2,728 कोरोना रुग्ण आहेत. धारावी परिसरातील वाढत्या प्रकरणांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढतो आहे. तर आर उत्तर म्हणजे दहिसर क्षेत्रात सर्वात कमी 309 कोरोना रुग्णांची नोंद आहे. मुंबईतील वॉर्डनिहाय कोरोनाव्हायरस रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे 2 हजारपेक्षा जास्त रुग्ण असलेले वॉर्ड जी उत्तर वॉर्ड - धारावी, माहीम, दादर : 2728 ई वॉर्ड - भायखळा, नागपाडा, माझगाव : 2438 एफ उत्तर वॉर्ड - माटुंगा किंग सर्कल :  2377 एल वॉर्ड - कुर्ला : 2321 एच पूर्व वॉर्ड - बांद्रा, सांताक्रुझ पूर्व : 2094 के पश्चिम वॉर्ड - अंधेरी पश्चिम : 2049 2 हजारपेक्षा कमी रुग्ण असलेले वॉर्ड जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टन : 1905 के पूर्व - अंधेरी पूर्व : 1875 एम पूर्व - गोवंडी, मानखुर्द : 1696 एफ दक्षिण - परेल दादर पूर्व : 1648 एन वॉर्ड - घाटकोपर : 1525 एस वॉर्ड - विक्रोळी, भांडुप नाहूर : 1278 आर उत्तर - दहिसर -309 हजारो बीएमसी कर्मचाऱ्यांना कोरोना मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं की, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) 1,529 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत कोरोनामुळे 25 कर्मचाऱ्यांनी प्राण गमावला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा बीएमसीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. हे वाचा - मुंबईतही आली टोळधाड; शोभा डेंपासून अनेकांनी शेअर केले फोटो गेल्या दोन महिन्यात महापालिकेत किती कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तसेच किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत कर्मचारी संघटनेने माहितीची मागणी केली होती. त्यांतर संयुक्त नगर आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) मिलिन सावंत यांनी 20 मे रोजी एक परिपत्रक जारी केले. त्यात कोरोनाबाधित कर्मचारी आणि मृतांच्या संख्येचा उल्लेख आहे. BMCने दिलेली माहिती अशी की, मुंबई फायर ब्रिगेड आणि सुरक्षा विभाग देखील कोरोनामुळे प्रभावित झाला आहे. फायर ब्रिगेडमध्ये जवळपास 35 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत दोन जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर सुरक्षा विभागात 80 हून कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे असून एकाचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी मलायकानं शोधली खास थेरपी, चाहत्यांसाठी VIDEO केला शेअर लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं
Published by:Priya Lad
First published:

पुढील बातम्या