• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • शर्मिला ठाकरेंची मध्यस्थी, वाडिया हॉस्पिटलला अखेर जीवदान मिळणार

शर्मिला ठाकरेंची मध्यस्थी, वाडिया हॉस्पिटलला अखेर जीवदान मिळणार

'रुग्णालय सुरू करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. वाडियातील अनियमिततेबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल.'

  • Share this:
मुंबई 15 जानेवारी : गेले काही दिवस वादाचा विषय झालेल्या वाडिया हॉस्पिटच्या वादावर आज निर्णयक तोडगा निघाल्याचा दावा करण्यात येतो. सामान्यांसाठी आधार असलेलं हे हॉस्पिटल बंद पडण्याच्या मार्गेवर आहे असं समजल्याने खळबळ उडाली होती. हा कट असल्याचाही आरोप झाला. तर सरकारचं अनुदान रखडल्याने हॉस्पिटल चालवणं अशक्य बनल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं. हा वाद चिघळल्याने त्यात राजकीय पक्षांनीही उडी घेतली. या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर या प्रश्नावर तोडगा निघाल्याचं अजित पवारांनी सांगितलं. शर्मिला ठाकरे यांनी एका शिष्टमंडळासह अजित पवारांची भेट घेतली आणि चर्चा केली. बाळा नांदगावकर हे देखील शिष्टमंडळात होते. तर दुसरीकडे वाडिया रुग्णालयाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी, स्थायी समिती अध्यक्ष यशवन्त जाधव, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, वाडिया हाँस्पिटलच्या सीईओ मीनी बोधनवाला उपस्थित. राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे सचिव देखील उपस्थित. वाडियाबाबत निर्णय सकारात्मक झाला आहे. राज्य सरकारचे 16-17 सालचे थकीत पन्नास टक्के 24 कोटी दोन दिवसात दिले जातील.  महापालिकेने 22 कोटी देण्याचे मान्य केले आहे उद्या सकाळपासून वाडियातील सेवा सुरळीत सुरू होतील. लगेच रुग्णालय सुरू करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. वाडियातील अनियमिततेबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल. रुग्णालयातील खाटा वाढवल्या कोणत्याही परवानगीशिवाय. जो करार झालाय त्यात बदल केला जाईल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, 7 वर्षांची मुलगी झाली पोरकी शुक्रावरपासून वाडिया रुग्णालयातील रुग्णांना घरी पाठवण्याचं काम हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात येत होतं. अत्यावश्यक औषधे घ्यायला आमच्याकडे पैसे नाही हे कारण सांगत 300 बालक आणि 100 महिला रुग्णांना परत पाठवल्याची माहिती वाडिया रुग्णालय ट्रस्टच्या सीईओ मिनी बोधनवाला यांनी दिली होती. नाराजी प्रकरणावर 'ठाकरे सरकार'मधल्या सर्वात पॉवरफुल मंत्र्याने दिली प्रतिक्रिया वाडिया ट्रस्टची बालकं आणि प्रसूती अशी दोन रुग्णालंय आहेत. या दोन्ही पैकी जेरबाई बालक रुग्णालयाला पालिकेकडून 105 कोटी तर नौरोसजी या प्रसूती रुग्णालयाला पालिकेचे 31 कोटी तर राज्यसरकारने 113 कोटी असे एकूण 250.91 कोटी रुपये अनुदान येणं बाकी आहे. पण वाडिया ट्रस्ट मनमानी करत असल्याने हे अनुदान थांबविण्यात आल्याचं बोललं जातंय.
Published by:Ajay Kautikwar
First published: