मुंबई, 16 ऑक्टोबर : मुंबईतील एका इमारतीच्या 22 व्या मजल्यावर रेड बूल हेल्थ ड्रिंक पिऊन स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अखेर मुंबई पोलिसांनी या पठ्याला शोधून काढले आहे. अवघ्या 24 तासांत मुंबई पोलिसांनी या स्टंटबाज तरुणाला अटक केली आहे.
नोमान डिसुझा असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. काही दिवसांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर या मुंबईत एका इमारतीवर स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या तरुणाचा आणि जागेचा शोध सुरू केला. पश्चिम कांदिवलीमध्ये जय भारत इमारतीच्या 22 व्या मजल्यावर हा स्टंट सुरू होता अशी माहिती पोलिसांना मिळाली.
मृत्यूला आमंत्रण देणारा स्टंट
— News18Lokmat (@News18lokmat) October 14, 2020
मुंबई: इमारतीच्या 22व्या मजल्यावर हातावर चालत तरुणाचा जीवघेणा स्टंट, पोलीस या तरुणाच्या आणि त्याच्या दोन मित्रांचा शोध घेत आहेत. असे स्टंट करून जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. pic.twitter.com/QrpeB8IhuD
पोलिसांनी जागेचा शोधला लावला पण तरुण फरार झाला होता. पण, अखेर या तरुणाला 24 तासात पकडले आहे. नोमान डिसुझा अशी या तरुणाची ओळख झाली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नोमान डिसुझा हा कांदिवली परिसरातच राहणार आहे. नोमान हा 22 व्या मजली इमारतीच्या बाल्कनीमध्ये उतरून स्टंट करत होता. तर त्याचे इतर दोन मित्र हे व्हिडीओ तयार करत होते.
असे जीवघेणे स्टंट करू नका आणि स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. आयुष्यात धाडस करण्यासाठी अनेक चांगली कामं आहेत. तरुणांनी त्या कामात लक्षं घातलं तर त्यांना आनंद मिळेल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.