मीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी, विनोद तावडेंचा 'राम'प्रताप

मीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी, विनोद तावडेंचा 'राम'प्रताप

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : भाजपचे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता भर घातलीये. माध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार झालीय आहे असं वादग्रस्त शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय. एवढंच नाहीतर माध्यम दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावाईशोधही तावडे यांनी लावलाय.

मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी विनोद तावडे आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी कुणाला राजकारणात यायचंय असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला. त्यावर विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद आल्यानं राजकारणाला बदनाम करण्यासाठी माध्यम जबाबदार आहे असं मत तावडेंनी व्यक्त केलंय.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असं वक्तव्य करणे हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. त्यांनी सर्व माध्यमांची जाहीर माफी मागावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार एसएम देशमुख यांनी केली.

विनोद तावडे यांनी याआधीही वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे टीकेचे धनी झाले होते 'आम्हा राजकीय नेत्यांना सगळंच फुकट द्यायची सवय असते. नागरिकसुद्धा जेवढे जेवढे फुकट मिळेल तेवढे बरं याच मूडमध्ये असतात,' असं वक्तव्यही विनोद तावडे यांनी मागील वर्षी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात केलं होतं.

तसंच 2017 मध्ये पुण्यात भारती विद्यापीठ पदवी प्रदान कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी विनोद तावडे यांनी पीएचडीतील गैरकारभाराचा खुलासाच केला. खरंखोटं काय आहे माहित नाही. पीएचडी ही काॅपीपेस्ट तरी आहे. किंवा प्राचार्य होण्यासाठी आहे तर कुठे पगारवाढ होण्यासाठी तरी आहे. संशोधन हे नावाला आणि कॉपी पेस्ट जादा अशी स्थिती आहे असा धक्कादायक खुलासा विनोद तावडे यांनी केला होता.

VIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 03:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading