मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी! मुंबईतील वाहनांसाठीचा 'कलर कोड' निर्णय अखेर मागे, आता दिसणार नाहीत कोणतेच स्टीकर

मोठी बातमी! मुंबईतील वाहनांसाठीचा 'कलर कोड' निर्णय अखेर मागे, आता दिसणार नाहीत कोणतेच स्टीकर

मुंबई पोलिसांनी शहर परिसरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व गाड्यांवर लाल, पिवळे आणि हिरवे स्टिकर (Mumbai police color code system) लावण्याचे आदेश मागे घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली होती.

मुंबई, 24 एप्रिल :  मुंबई पोलिसांनी शहर परिसरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व गाड्यांवर लाल, पिवळे आणि हिरवे स्टिकर (Mumbai police color code system) बसविण्याचे आदेश मागे घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai police commissioner Hemant Nagrale) यांनी स्वत: या मोहिमेत सहभाग घेत काही गाड्यांना स्टीकर लावण्याचे काम केले होते. मात्र, हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'प्रिय मुंबईकरांनो. लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.'

वैद्यकीय सेवेसाठी लाल, भाज्यांच्या गाड्यांसाठी हिरवा आणि इतर आवश्यक सेवांसाठी पिवळ्या रंगाचे स्टिकर वाहनांना लावले जात होते. याप्रकारचे स्टिकर न लावता वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. हा नियम तयार करण्यात आला होता, जेणेकरून विनाकारण कारसह प्रवास करणाऱ्या लोकांवर कारवाई करता येईल आणि अत्यावश्यक सेवेतील कोणाची विनाकारण अडवणूक होणार नाही. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

(हे वाचा- खाकीबरोबर माणुसकीनेही जिंकलं, बेड मिळवण्यापासून डबे पुरवण्यापर्यंत हजारोंची केली सेवा)

ट्रॅफिक कोंडीतून सुटकेसाठी कलर कोड सिस्टीम

मुंबईमध्ये अनावश्यक कारणासाठी बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. नाकाबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी देखील अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रॅफिक कोंडीपासून त्यांची सुटका व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी कलर कोड सिस्टीम लागू केली होती. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने, खाद्यपदार्थांची वाहतुक करणारी वाहने आणि आरोग्य सेवेतील वाहने यांच्यावर वेगवेगळ्या रंगाचे स्टीकर लावण्यात येत होते. त्यामुळे पोलिसांना अशी वाहने पटकन नजरेस पडतील आणि त्यांना नाकाबंदीतून ताबडतोब सोडता येईल. पण आता ही प्रणाली मागे घेण्यात आली आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai News, Mumbai Poilce