वायू चक्रीवादळाने घेतला दुसरा बळी, बँडस्टँड समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

वायू चक्रीवादळाने घेतला दुसरा बळी, बँडस्टँड समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

मुंबई आणि कोकणातील अनेक ठिकणी वायू चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळाला. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.

  • Share this:

मुंबई, 13 जून : वायू चक्रीवादळाने महाराष्ट्रामध्ये दुसरा बळी घेतला आहे. वांद्र्याच्या बँडस्टँड समुद्रात बुडाल्याने एका 29 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वायू चक्रीवादळ घोंगावत असल्यामुळे कोणीही समुद्रकिनारी जायचं नाही अशा सुचना महाराष्ट्र सरकार आणि हवामान विभागाकडून देण्यात आल्या होत्या. समुद्र किनारी जाण्यावर बंदी असतानादेखील अशी घटना घडल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई आणि कोकणातील अनेक ठिकणी वायू चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळाला. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे मुंबईमध्ये अनेक शहरामध्ये झाडं कोसळली. ज्यामध्ये सगळ्यात जास्त झाडं ही बोरीवली भागात कोसळली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, शहरामध्ये 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. तर अशा परिस्थीत कोणालाही समुद्रकिनारी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वायू चक्रीवादळ जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाण्यावरही सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घालण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक उड्डाणं रद्द...

वायू चक्रीवादळामुळे मुंबईसह, कोकण किनारपट्टी त्याचबरोबर गुजरातमध्ये मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे एअरवेजचं विमान रनवेवर साईट लाईटला धडकले. ज्यानंतर मुंबईल आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अनेक विमानांचं उड्डाण उशिरा सुरू आहे.

अनेक बीच पुढचे 2 दिवस पर्यटकांसाठी बंद...

हेही वाचा : ICC तुम्हाला जमणार नाही असे भरवा सामने, भडकलेल्या चाहत्यांनी सुचवले भन्नाट उपाय

वायू चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेत सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राकील अनेक जिल्ह्यांत बीचवर जाण्यासाठी पर्यंटकांना बंदी घालण्यात आली आहे. कोकण, पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि रत्नागिरीतील बीच 12 ते 13 जूनला बंद ठेवण्यात आले होते.

यावेळी मच्छीमारांनाही समुद्रकिनारी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने आजदेखील  दुपारी हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावर होतं. तसंच सोसाट्याचा वारादेखील होता. या वाऱ्यामुळे ठाणे पश्चिम स्थानका बाहेर एक होर्डिंग खाली पडलं. तर यात एकजण जखमीदेखील झाला आहे.

VIDEO : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तुमचं नाव पुढे? उदयनराजेंची तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2019 07:01 PM IST

ताज्या बातम्या