युवकाच्या शरीरातून गर्भाशय आणि योनी काढली बाहेर, मुंबईत समोर आली दुर्मिळ घटना

युवकाच्या शरीरातून गर्भाशय आणि योनी काढली बाहेर, मुंबईत समोर आली दुर्मिळ घटना

रुग्णालयाच्या यूरोलॉजी विभागाचे मुख्य डॉक्टर वेंकट गीते यांनी सांगितलं की, 26 जून रोजी तरुण शस्त्रक्रिया करण्यासाठी आला होता. त्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर तरुणाच्या शरीरातून गर्भाशय, फलोपियन ट्यूब, सर्विक्स आणि योनीचा भाग काढण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : मुंबईच्या सरकारी जेजे रुग्णालयात एक 29 वर्षीय युवकाच्या शरीरातून डॉक्टरांनी महिलेचे अवयव काढले असल्याची माहिती समोर आली आहे. युवकाच्या शरीरातून गर्भाशय, फेलोपियन ट्यूब आणि योनी असे महिलेचे अवयव काढण्यात आले. नपुंसकतेचा उपचार करण्यासाठी युवक हॉस्पिटलमध्ये आला होता. तर युवकाच्या शरीरात महिलेचे अवयव असणं अशा 200 घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत अशी माहिती जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

रुग्णालयाच्या  यूरोलॉजी विभागाचे मुख्य डॉक्टर वेंकट गीते यांनी सांगितलं की, 26 जून रोजी तरुण शस्त्रक्रिया करण्यासाठी आला होता. त्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर तरुणाच्या शरीरातून गर्भाशय, फलोपियन ट्यूब, सर्विक्स आणि योनीचा भाग काढण्यात आला आहे. आतापर्यंत अशा 200 शस्त्रक्रिया झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याला प्रक्रियेस 'प्रेसिस्टेंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम' असं  म्हणतात.

रुग्णाच्या शरीराची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना या बाबतील कल्पना आली आणि त्यानंतर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती गीते यांनी दिली. शस्त्रक्रियेनंतर तरुणाच्या शरीरातून गर्भाशय, फलोपियन ट्यूब, सर्विक्स आणि योनीचा बाहेर काढण्यात आला. आता त्याच्यावर सध्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अशा पद्धतीची कठीण शस्त्रक्रिया झाल्यानंतर तरुणाची प्रकृती आता योग्य असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. पण यानंतर युवक कधीही बाप होऊ शकणार नाही. कारण, तरुण 'एजोर्स्पमिया' या आजाराने पीडित आहे.

VIDEO: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा धक्का, गुणरत्न सदावर्ते यांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या