• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Mumbai unlock: मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकानं खुली राहणार, हॅाटेलसाठीही नियम बदलले

Mumbai unlock: मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकानं खुली राहणार, हॅाटेलसाठीही नियम बदलले

मुंबईत चित्रिकरणाला आधीच्या नियमाप्रमाणे परवानगी राहणार आहे. नवीन नियम ३ ॲागस्टपासू लागू होतील.

 • Share this:
  मुंबई, 02 ॲागस्ट : राज्य सरकारकडून अनलॅाकबद्दल नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवले आहे. तर मुंबई आणि ठाण्यात निर्णय घेण्याचे अधिकार पालिकेवर सोडले होते. त्यानुसार, मुंबई महापालिकेनं (bmc) मुंबईत नियम शिथिल केले असून दुकानं १० वाजेपर्यंत सुरू आहे. तर हाॅटेल ४ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. राज्य सरकारने ब्रेक द चेन नियमावली जाहीर केल्यानंतर मुंबई महापालिकेनं शहरासाठी नियमावली जाहीर केली आहे. मुंबई अजूनही लेव्हल ३ मध्ये आहे. त्यामुळे विकेंडच्या नियमात बदल केले आहे. दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवता येणार आहे. तसंच हॉटेल संध्याकाळी 4 पर्यंत खुले राहतील. पण हॉटेल-रेस्टॉरंट सर्व दिवस संध्याकाळी 4 पर्यंत खुले राहण्यास मुभा दिली आहे. तर विमिंग पूल मात्र खेळासाठी बंद राहतील. मुंबईत चित्रिकरणाला आधीच्या नियमाप्रमाणे परवानगी राहणार आहे. नवीन नियम ३ ॲागस्टपासू लागू होतील. लोकलचे दार बंदच! राज्यात कोरोनाची लाट आता आटोक्यात आली आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा सुरू करावी, अशी आग्रहाची मागणी होत आहे. पण नवी नियमावली जाहीर झाली असून लोकल सुरू करण्याबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे लाखो चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. राज्य सरकारकडून ११ जिल्हे वगळता अनलॅाकचे नियम शिथिल Restrictions relaxed) करण्यात आले आहे.. या संदर्भात नवी नियमावली (New guidelines) जाहीर केली आहे. पण मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लोकल सुरू करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कोर्टात टोलवण्यात आला आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याबद्दल वेगळी घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने विचार सुरू आहे. ज्यांना लसींचे दोन डोस दिले आहेत त्यांना प्रवासाची परवानगी द्यायची का? पण हे करायचं झालं तर तितकी तपासणी यंत्रणा आहे का? रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करुन मुख्यमंत्री स्तरावर घेतला जाईल. त्यामुळे आता राज्य सरकार लोकल ट्रेन संदर्भात काय निर्णय घेतं हे पहावं लागेल.
  Published by:sachin Salve
  First published: