मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईसाठी 1 जूनपासून नवीन Lockdown नियमावली; सर्व दुकानं उघडणार पण...

मुंबईसाठी 1 जूनपासून नवीन Lockdown नियमावली; सर्व दुकानं उघडणार पण...

Mumbai Unlock Guidelines: मुंबईत मंगळवारपासून म्हणजे 1 जूनपासून अत्यावश्यक सामान विकणाऱ्या दुकानांची वेळ 11 ऐवजी दुपारी 2 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मुंबई, 31 मे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केल्याप्रमाणे पुढचे 15 दिवस Lockdown निर्बंध राहणार आहेत. या काळात मुंबईत थोड्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने 1 ते 15 जून दरम्यान काय नवे नियम असतील आणि कुठले निर्बंध शिथिल होतील यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. मुंबईत मंगळवारपासून म्हणजे 1 जूनपासून अत्यावश्यक सामान विकणाऱ्या दुकानांची वेळ 11 ऐवजी दुपारी 2 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच इतर सर्व दुकानं एका आड एक दिवस उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठेतली रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं एका दिवशी उघडतील. तसंच शनिवार-रविवार बाजार बंद राहील. वीकएंड लॉकडाउन आत्ता आहे तसाच सुरू राहील आणि त्या दिवशी अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त सगळं बंद राहील, असं महापालिका आयुक्तांनी जाहीर केलं आहे. मुंबईच्या रस्त्यावर गर्दी पाहून मुख्यमंत्री ठाकरे नाराज, कडक निर्बंध लागू? याशिवाय सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालायचे नियम कायम आहेत. ते न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कशी आहे मुंबईची 15 जूनपर्यंतची नियमावली अत्यावश्यक दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकानं सोमवार, बुधवार, शुक्रवारी उघडी राहतील. डाव्या बाजूची दुकानं फक्त मंगळवार, गुरुवार उघडतील. दुसऱ्या आठवड्यात डाव्या बाजूची दुकानं एकाआड एक तीन दिवस उघडतील. तर उजव्या बाजूची दोनच दिवस खुली राहतील. 15 जूनपर्यंत कसा असेल लॉकडाऊन? तुमच्या मनातील प्रश्न आणि शासनाने दिलेली उत्तरं शनिवार, रविवारी फक्त अत्यावश्यक सामान विकणारी दुकानं खुली. बाकी संपूर्ण बाजाप बंद E commerce म्हणजे ऑनलाइन शॉपिंगअंतर्गत सर्व प्रकारच्या वस्तूंच्या वितरणाला परवानगी.
First published:

Tags: Breaking News, Mumbai, Mumbai News

पुढील बातम्या