मनोज कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई: मुलुंडमधील खिंडीपाडा परिसरात सोमवारी रात्री उशिरा पार्किंग केलेल्या 10 ते 12 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा लोखंडी रॉड आणि दगडाने फोडल्या आहेत. खिंडीपाडामध्ये अज्ञात गुंडांनी हा प्रकार केल्या असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुलुंडच्या या परिसरामध्ये अज्ञात गुंडांनी हैदोस घातला आहे. 8 दिवसांपूर्वी अशा प्रकारची घटना घडली होती. सोमवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा गाड्या फोडण्याचा प्रकार घडला. सोमवारी रात्री 5 गुंडानी नशा करून रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड केली. अनेक गाड्यांच्या काचा फोडल्यानं मोठं नुकसान झालं आहे. स्थानिकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित गुंडाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. याआधीच पोलिसांनी गुंडांना आवर घातला असता तर असा प्रकार पुन्हा घडला नसता असा आरोपी स्थानिक नागरिकांनी केला आहे. याआधी 8 दिवसांपूर्वी असा प्रकार घडला तेव्हाच पोलिसांनी कठोर कारवाई का केली नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.