मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख रजेवर

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख रजेवर

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख आता रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागेवर देवानंद शिंदे हे सध्या मुंबई विद्यापीठाचा कारभार पाहणार आहेत.

  • Share this:

10 आॅगस्ट : वेळेवर निकाल न लागल्यामुळे वादात अडकलेल्या मुंबई विद्यापीठाचे अजूनही निकाल लागले नाही. त्यातच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख आता रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागेवर देवानंद शिंदे हे सध्या मुंबई विद्यापीठाचा कारभार पाहणार आहेत.

शिंदे हे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी धीरेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर धीरेन पटेल हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान महाविद्यालय म्हणजेच व्हीजेटीआयचे संचालक आहेत.

आयबीएन लोकमतचे सवाल

1) कुलगुरू बदलले, निकाल कधी लागणार ते नक्की सांगा?

2) निकाल सोडून संजय देशमुख सुट्टीवर कसे गेले?

3) देशमुख यांचे निर्णय अमलात आणायला शिंदे किती वेळ घेणार?

4) विद्यार्थ्यांच्या नुकसानाला कोण जबाबदार?

5) देशमुखांना सुट्टीवर पाठवून सरकार जबाबदारी ढकलतंय का?

First published: August 10, 2017, 4:34 PM IST

ताज्या बातम्या