मुंबई विद्यापीठाचा गोंधळ कायम; प्रवेश प्रक्रियेनंतर महिन्याभरातच सत्र परीक्षा

मुंबई विद्यापीठाचा गोंधळ कायम; प्रवेश प्रक्रियेनंतर महिन्याभरातच सत्र परीक्षा

पण ही प्रक्रिया संपल्यानंतर फक्त 27 दिवसांत सत्र परीक्षा होणार आहे. एम ए आणि एम.कॉमच्या परीक्षा २७ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याने विद्यार्थांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.

  • Share this:

15 डिसेंबर : आपल्या अभूतपूर्व गोंधळासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई विद्यापीठाने आणखी एक गोंधळ घातलाय. एम.ए आणि एम.कॉम या दोन्ही विषयाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच पहिल्या सत्राची परिक्षा विद्यार्थांसाठी ठेवण्यात आली आहे.

यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या निकालात प्रचंड गोंधळ उडाला. नेहमी जूनमध्ये लागणारा निकाल यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत लागला. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय तर झालीच तसंच अनेक विद्यार्थ्यांचं नुकसानही झालं. यातून सावरत असतानाच आता एम. ए आणि एम.कॉम च्या विद्यार्थ्यांना नवीन समस्येस तोंड द्यावं लागत आहे.

एमए आणि एमकॉमची प्रवेश प्रक्रिया ३० नोव्हेंबरला पूर्ण झाली. पण ही प्रक्रिया संपल्यानंतर फक्त 27 दिवसांत सत्र परीक्षा होणार आहे. २७ डिसेंबरपासून त्यांची परीक्षा सुरू होणार असल्याने विद्यार्थांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.

खरं तर विद्यापीठ आयोगाच्या नियमांप्रमाणे परीक्षेच्या 90 दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्याचं प्रयोजन आहे पण असं असताना देखील विद्यापीठाने मात्र 27 दिवसातच परिक्षा घेण्याचा घाट घातला आहे.

उशिरा कॉलेजेस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासही पूर्ण झालेला नाही. अनेक विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय होते आहे. या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्यामुळे मुंबई विद्यापीठातील सगळा गोंधळ संपवण्यासाठी आतातरी काही योग्य पाऊलं उचलली जातात का हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 12:11 PM IST

ताज्या बातम्या