Elec-widget

मुंबई विद्यापीठाकडून कुलगुरू संजय देशमुखांचं अभिनंदन?

मुंबई विद्यापीठाकडून कुलगुरू संजय देशमुखांचं अभिनंदन?

ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयासाठी कुलगुरूंचं अभिनंदन करण्याची चर्चा होचे आहे. अकॅडेमिक काउंसीलमध्ये संजय देशमुखांच्या अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा होते आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर: विद्यार्थ्यांचं करिअर ज्या ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयामुळे पणाला लागलं त्याच ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयासाठी कुलगुरूंचं अभिनंदन करण्याची चर्चा होचे आहे. अकॅडेमिक काउंसीलमध्ये संजय देशमुखांच्या अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा होते आहे.

पाच महिने उलटले तरी पदवी परीक्षांचे सर्व निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. इतकंच काय तर शेकडो उत्तरपत्रिका विद्यापीठाकडून गहाळ झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं अख्ख वर्ष वाया गेलं. पण मुंबई विद्यापीठाला त्याची जाणीव नसल्याचंच कृत्य विद्यापीठाकडून झालंय. कुलगुरु डॉ. संजय देशमुख ज्यांना ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयानंतर कुलपती सी.विद्यासागर राव यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलंय. त्यांचं चक्क अभिनंदन करण्याचा विचार मुंबई विद्यापीठाने केलाय. बुधवारी संध्याकाळी पार पडलेल्या अकॅडमिक काउंसीलमध्ये डॉ.संजय देशमुख यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा करण्यात आलीय. मुंबई विद्यापीठाकडूनच ही माहिती मिळाली असून विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया यावर उमटल्या आहेत. कुलपती सी. विद्यासागर राव यांनी अजूनही कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना कामावर रुजू करुन घेतलेलं नाही. तर त्यांना राजीनामा मागितला असल्याची चर्चा देखील आहे. अशा परिस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमिक काउंसीलच्या सभासदांनी मात्र देशमुख यांच्या अभिनंदनाविषयी चर्चा केलीय.

मुंबई विद्यापीठाचं हे कृत्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम आहे अशी चर्चा होते आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 11:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...