S M L

मुंबई विद्यापीठाचे निकाल अजून बाकीच!, पण प्रभारी कुलगुरू म्हणतात,'करून दाखवलं'

८ शाखांचे निकाल बाकी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या - ५७०९९, हे निकाल जरी लागले असले तरी त्यात अनेक त्रुटी आहेत.

Sachin Salve | Updated On: Sep 11, 2017 06:56 PM IST

मुंबई विद्यापीठाचे निकाल अजून बाकीच!, पण प्रभारी कुलगुरू म्हणतात,'करून दाखवलं'

प्राजक्ता पोळ-शिंदे, मुंबई

11 सप्टेंबर : मुंबई विद्यापीठाचे ४७७ पैकी आता ८ शाखांचे निकाल बाकी राहिले आहेत. पण कार्यभार स्विकारून आज १ महिना झाला. या एका महिन्यात १७२ शाखांचे निकाल लावले असा दावाच प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांनी केला.

गेले तीन महिने मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ सुरू आहे. निकालाचा हा तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महिन्याभऱात केलेल्या कामाचा पाढा वाचला. पदभार हाती घेऊन १ महिन्यात आम्ही १७२ शाखांचे निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याचा दावाच देवानंद शिंदे यांनी केला.मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या सध्याच्या स्थितीवर नजर टाकली तर

विद्यापीठाच्या एकूण शाखांचे निकाल  ४७७ लागलेले

- ४६९ बाकी निकाल

Loading...

- ८ शाखांचे निकाल बाकी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या - ५७०९९

- लागलेल्या निकालांपैकी राखीव ठेवण्यात आलेले निकाल - २८४९८

- बाकी निकालांच्या शाखा - वाणिज्य

हे निकाल जरी लागले असले तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींसह ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन कुलगुरूंनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2017 06:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close