मुंबई विद्यापीठाच्या निकालाची 19 सप्टेंबर नवी डेडलाईन

मुंबई विद्यापीठाच्या निकालाची 19 सप्टेंबर नवी डेडलाईन

बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे सगळे निकाल लावता आले नाहीत असं हास्यास्पद कारण मुंबई विद्यापीठानं यावेळी कोर्टात दिलं.

  • Share this:

मुंबई,07 सप्टेंबर: मुंबई विद्यापीठानं पुन्हा एकदा निकालाची डेडलाईन पुढे ढकलली आहे. आता १९ सप्टेंबर ही मुंबई विद्यापीठीनं निकाल लावण्यासाठी डेडलाईन ठेवली आहे अशी माहिती मुंबई हायकोर्टाला दिली आहे. तर कोर्टाने निकालाचा लेखी हिशोब मागितला आहे. अजूनही विद्यापीठाचे 14 निकाल लागणं बाकी आहेत.

बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे सगळे निकाल लावता आले नाहीत असं हास्यास्पद कारण मुंबई विद्यापीठानं यावेळी कोर्टात दिलं. गेल्या वेळी मुंबईत पडलेला पाऊस आणि गणेशोत्सव हे कारण होतं. त्यामुळे मुंबई विद्यापीठ देत असलेल्या डेडलाईन्सना काहीच अर्थ उरलेला नाही हे स्पष्ट होत आहे. यावेळी केव्हापर्यंत निकाल लावाल हे लेखी द्या आणि त्याची कारणंही द्या असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला आहे. ऑनलाईन निकाल लावण्यास उशीर का होतो आहे अशी कोर्टाने विचारलं असता रोबोट नाहीत तर माणसं पेपर तपासण्याचं काम करत असल्यानं वेळ होत आहे असं विद्यापीठानं सांगितलं.

विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे लॉ सीईटीची फॉर्म भरण्याची मुदतही २२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

First published: September 7, 2017, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading