मुंबई विद्यापीठाने निकालात घोळ करणाऱ्या मेरीट ट्रॅक कंपनीला दिले 1.18 कोटी

मुंबई विद्यापीठाने निकालात घोळ करणाऱ्या मेरीट ट्रॅक कंपनीला दिले 1.18 कोटी

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांने मुंबई विद्यापीठाकडे मेरीट ट्रॅक कंपनीस मुंबई विद्यापीठाने अदा केलेल्या रक्कमेची आणि शिल्लक रक्कमेची माहिती मागितली होती. मुंबई विद्यापीठाने अनिल गलगली यांस कळविले की मेरीट ट्रॅक सर्व्हिस प्रा.लिमिटेड कंपनीने दोन देयके सादर केली होती. एक देयक दिनांक 18 मे 2017 रोजी सादर केले होते त्याची रक्कम रुपये 1,48, 63, 750/- इतकी होती.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर: मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा निकालाचे तीन तेरा वाजविणाऱ्या वादग्रस्त मेरीट ट्रॅक कंपनीस मुंबई विद्यापीठाने रुपये 1.18/- कोटी अदा केले आहेत. जो निकाल लटकल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले त्यासाठा जबाबदार ही कंपनी आहे. ही रक्कम अदा केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांने मुंबई विद्यापीठाकडे मेरीट ट्रॅक कंपनीस मुंबई विद्यापीठाने अदा केलेल्या रक्कमेची आणि शिल्लक रक्कमेची माहिती मागितली होती. मुंबई विद्यापीठाने अनिल गलगली यांस कळविले की मेरीट ट्रॅक सर्व्हिस प्रा.लिमिटेड कंपनीने दोन देयके सादर केली होती. एक देयक दिनांक 18 मे 2017 रोजी सादर केले होते त्याची रक्कम रुपये 1,48, 63, 750/- इतकी होती. तर दुसरे देयक दिनांक 16 ऑगस्ट 2017 रोजी सादर केले होते त्या देयकांची रक्कम रुपये 2,69,27,350.99/- इतकी आहे. या दोन देयकांची एकूण रक्कम रु 4,17,91,100.99/- इतकी होत आहे. मुंबई विद्यापीठाने त्यापैकी रुपये 1,18,17,404/- इतकी रक्कम अदा केली असून सध्या त्यापैकी रुपये 2,99,73,696.99/- इतकी रक्कम उर्वरित आहे. अनिल गलगली यांच्या मते ज्या मेरीट ट्रॅक कंपनीमुळे मुंबई विद्यापीठाची नाचक्की झाली आणि संपूर्ण जगात मुंबई विद्यापीठास परीक्षा जाहीर करण्याच्या बाबतीत सपशेल हार पत्करावी लागली त्या कंपनीस काळ्या यादीत टाकत दंड वसूल करण्याऐवजी आर्थिक सहाय्य करणे चुकीचे आहे.

कुलसचिव आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, कुलगुरु प्रो देवानंद शिंदे यांस लिहिलेल्या पत्रात अनिल गलगली यांनी पुढील रक्कम अदा न करत दंड वसूल करण्याची मागणी केली आहे. मेरीट कंपनीस प्रोत्साहन देणाऱ्या डॉ संजय देशमुख यांस बाहेरचा रस्ता दाखविला गेला पण ज्या मेरीट कंपनीमुळे सर्वत्र गोंधळ उडाला त्यास अजूनही सांभाळत मदत करणे चुकीचे असल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली. एका उत्तरपत्रिके मागे कर वगळून 23.50 रु हे मेरिट्रेक ला द्यायचा ठराव मंजूर झाला होता. तर इतके पैसे देणे ही तर लूट आहे अशी टीका शिक्षक संघटनेने केली आहे. एवढे पैसे तर मूल्यांकन करणाऱ्या मास्तराला पण मिळत नाहीत असं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे.

आता यानंतर तरी या कंपनीवर कार्यवाही होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 23, 2017, 9:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading