मुंबई विद्यापीठाच्या निकालाची मुदत तिसऱ्यांदा हुकली, कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई विद्यापीठाच्या निकालाची मुदत तिसऱ्यांदा हुकली, कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी

15 ऑगस्ट उलटून गेली तरी अनेक विभागांचे निकाल अद्याप बाकी आहेत. त्याशिवाय लागलेल्या निकालांमध्येही अनेक घोळ आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर आहे.

  • Share this:

16 आॅगस्ट : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे हाल अद्याप संपलेले नाहीत . 15 ऑगस्ट उलटून गेली तरी अनेक विभागांचे निकाल अद्याप बाकी आहेत. त्याशिवाय लागलेल्या निकालांमध्येही अनेक घोळ आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर आहे.

मुंबई विद्यापीठाचा कारभार आता जरी देवानंद शिंदे यांनी स्वीकारला असला तरी संजय देशमुख राजीनामा कधी देणा़र हाच प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून विचारला जातोय.

दरम्यान IBNलोकमतच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपली तगमग व्यक्त केली. ते हवालदिल झालेत. निकाल लांबणीवर पडल्यानं त्यांचं भविष्य टांगणीला लागलंय.

मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू ए. डी. सावंत म्हणाले, ' विद्यापिठानं या गोंधळावर लवकरच काही पर्याय शोधला पाहिजे.'

मुंबई विद्यापीठाच्या घोळावर IBNलोकमतचे सवाल

कुलगुरू डॉ.देशमुख राजीनामा कधी देणार?

निकालाच्या डेडलाईन कधी संपणार?

विद्यार्थ्यांचं नुकसान शिक्षण विभाग भरून देणार का?

या गोंधळामुळे इतर प्रवेश प्रक्रियेवर होणाऱ्या परिणामांचं काय?

जाहीर झालेल्या निकालांमधल्या त्रुटींचं काय?

First published: August 16, 2017, 11:55 AM IST

ताज्या बातम्या