निकालांनंतर मुंबई विद्यापीठ लॉच्या पुनर्परीक्षेची तारीख पुढे ढकलणार

निकालांनंतर मुंबई विद्यापीठ लॉच्या पुनर्परीक्षेची तारीख पुढे ढकलणार

पुर्नमूल्यांकनाचे निकाल अजून जाहीर झालेले नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठानं हा निर्णय घेतलाय

  • Share this:

मुंबई,10 नोव्हेंबर:मुंबई विद्यापीठाचे घोळ संपता संपत नाही आहे. आधी रखडलेले निकाल पुनर्मूल्यांकनातील घोळ यासाऱ्यानंतर आता विधीच्या पुनर्परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

13 नोव्हेंबरला ही परीक्षा घेण्यात येणार होती. विद्यार्थ्यांनी तारीख पुढे ढकलण्यासाठी आंदोलन केलं  होतं.पूर्नमुल्यांकनाचे निकाल अजून जाहीर झालेले नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठानं हा निर्णय घेतलाय. मुंबई विद्यापीठाने निकालासाठी तीन ते चार वेळा डेडलाईन दिली होती. मात्र तरीही निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासनाला अपयश आलं. हाय कोर्टाने यासाठी विद्यापीठाला फटकारलंही होतं ऑनलाईन प्रक्रियेतील घोळामुळे निकाल लांबले होते. विधानसभेतही विरोधकांनी यावरून सरकारला घेरलं होतं. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

त्यामुळे आता पुर्नमूल्यांकनाचे निकाल तरी बरोबर लागतात के पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 08:58 AM IST

ताज्या बातम्या