रेल रोकोमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षेचा 1 तास वाढवला

रेल रोकोमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षेचा 1 तास वाढवला

आंदोलनामुळे वेळेवर पोहोचू न शकलेल्यांना मुंबई विद्यापीठाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 1 तास वाढवून मिळणार आहे.

  • Share this:

20 मार्च : माटुग्यांत रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थी संघटनेनं आज सकाळी ७ पासून सुरू केलेलं आंदोलन अखेर साडेतीन तासांनंतर मागे घेण्यात आलं आहे. पण आजच्या या आंदोलनामुळे शाळा, कॉलेजमध्ये सुरू असलेल्या परीक्षांना विद्यार्थी पोहचू शकले नाही. त्यामुळे परीक्षार्थींना एक तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. असं परिपत्रकच मुंबई विद्यापीठाकडून जारी करण्यात आलं आहे.

आज दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच बीए, बीकॉम आणि बीएससीचे पेपर आहेत. आंदोलनामुळे वेळेवर पोहोचू न शकलेल्यांना मुंबई विद्यापीठाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 1 तास वाढवून मिळणार आहे.

रेल्वे आंदोलनामुळे ज्या विद्यार्थ्यांना १० वाजताच्या पेपरला वेळेवर पोहचता आलं नाही त्यांना १ तास परीक्षेला वेळ देण्याची मुभा देण्यात आलं आहे.

 

First published: March 20, 2018, 11:36 AM IST

ताज्या बातम्या