Home /News /mumbai /

मुंबई विद्यापीठाचा निकाल जाहीर, ऑनलाईन परीक्षेमुळे उत्तीर्णांची संख्या उदंड

मुंबई विद्यापीठाचा निकाल जाहीर, ऑनलाईन परीक्षेमुळे उत्तीर्णांची संख्या उदंड

मुंबई विद्यापीठाच्या कोरोना काळात ऑनलाईन झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर्षी सर्वाधिक आहे. जेमतेम 3 टक्के विद्यार्थीच यंदा नापास झाले आहेत.

  मुंबई , 15 फेब्रुवारी :  मुंबई विद्यापीठाने कोरोना काळात (Coronavirus) घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. ऑनलाईन परीक्षांमुळे (Mumbai University Exam Results) आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल विद्यापीठातून लावला गेला आहे. सर्वााधित विद्यार्थी या परीक्षेत पास झाली आहेत. अनुत्तीर्णांचं प्रमाण फक्त 3 टक्क्यांच्या आसपास आहे. विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या 7 परीक्षांचे निकाल सोमवारी जाहीर केले आहेत. ते विद्यापीठाच्या या http://www.mumresults.in/ या वेबसाइटवर पाहता येतील.
  BSc IT  पाचव्या सेमिस्टरचा परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात झाला. ऑनलाइन परीक्षांचा निकाल 96.73 टक्के  लागला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या  संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे विध्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.
   या परीक्षेत एकूण 8हजार 453 विद्यार्थी यशस्वीरित्या पास झाले आहेत . तर  286 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाचे  62 निकाल जाहीर झाले आहेत. आज विद्यापीठाने  आर्किटेक्चर चौथे वर्ष, एमएमएस  सीबीएसजीएस सत्र 4,  एमएमएस चॉईस बेस सत्र 4, एमएमएस चॉईस बेस सत्र 4, एमएमएस डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट चॉईस बेस सत्र 3, बीई प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सत्र 7 चॉईस बेस व बीएस्सी आयटी  सत्र 5 अशा 7 परीक्षांचे  निकाल जाहीर केले आहेत.
   दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालयं अजूनही ऑनलाइनच सुरू आहेत. किमान 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन कॉलेज सुरू असतील, असं जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या काही भागात Coronavirus चा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असल्याने ऑनलाइन कॉलेजची मुदत आणखी वाढूही शकते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Exam

  पुढील बातम्या