मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई विद्यापीठ: Onlineच्या घोळामुळे रखडलेल्या परीक्षा 19 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार

मुंबई विद्यापीठ: Onlineच्या घोळामुळे रखडलेल्या परीक्षा 19 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार

19 ऑक्टोबरपासून या सर्व परीक्षा होणार असून त्याचं वेळापत्रक वेबसाईवर जाहीर करू असंही विद्यापीठाने म्हटलं आहे.

19 ऑक्टोबरपासून या सर्व परीक्षा होणार असून त्याचं वेळापत्रक वेबसाईवर जाहीर करू असंही विद्यापीठाने म्हटलं आहे.

19 ऑक्टोबरपासून या सर्व परीक्षा होणार असून त्याचं वेळापत्रक वेबसाईवर जाहीर करू असंही विद्यापीठाने म्हटलं आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 07 ऑक्टोबर: मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University )आणि आयडॉलच्या होऊ न शकलेल्या सर्व Online परीक्षा या 19 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार असल्याचं विदयापीठाने जाहीर केलं आहे. Online परीक्षा घेताना प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यामुळे अनेक मुलं परीक्षेपासून वंचित राहिली होती. त्यामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या मुलांनी विद्यापीठात गोंधळही घातला होता. त्या सगळ्यांची दखल घेत विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. 19 ऑक्टोबरपासून या सर्व परीक्षा होणार असून त्याचं वेळापत्रक वेबसाईवर जाहीर करू असंही विद्यापीठाने म्हटलं आहे.

याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले. बुधवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेतांना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये असेही संचालक पाटील यांनी सांगितले.

सायबर हल्ला झाल्याने सर्व्हर क्रॅश झालं होतं त्यामुळे गोंधळ उडाला असंही सांगण्यात आलं होतं. या प्रकणाची चौकशी करण्यात येईल असंही शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

मुंबईत बसून अमेरिकेतल्या लोकांना घातला गंडा, मोठ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचा बीकॉम अंतिम वर्षाचा पेपर मंगळवारी पुढे ढकलण्यात आला आहे. Online परीक्षा देता न आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. परीक्षेच्यावेळी मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. परीक्षा देऊ न शकलेले शेकडो विद्यार्थी विद्यापीठात आले आणि त्यांनी विचारणा केली.

MPSC परीक्षा घेतली तर वाईट परिणाम भोगावे लागतील, संभाजीराजेंचा थेट इशारा

Online परीक्षेसाठी जी तयारी करायला पाहिजे ती तयारी करण्यात आली नव्हती असा मुलांचा आरोप होता. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस मध्ये सगळे विद्यार्थी जमले होते. तीन ऑक्टोबरपासून ही परीक्षा सुरू झाली असून पहिलाच पेपर अनेक विद्यार्थ्यांना देता आला नव्हता. मंगळवारी दुसरा पेपर होता आणि हा ही पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आणि चिंताही होती. कोरोनामुळे आधीच सगळं वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यात आता परीक्षाही नीट देता येत नसल्याने आपलं वर्ष तर वाया जाणार नाही ना याची काळजी विद्यार्थ्यांना होती.

First published: