लोकसभा 2019: किरीट सोमय्यांची भेट 'मातोश्री'ने नाकारली, पत्ता कट होणार?

लोकसभा 2019: किरीट सोमय्यांची भेट 'मातोश्री'ने नाकारली, पत्ता कट होणार?

स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या नावाला विरोध केला असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरी ईशान्य मुंबईतील उमेदवारांवरुन अद्याप एकमत झालेले नाही. शिवसेनेने या मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केला आहे. स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या नावाला विरोध केला असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यातच आता सोमय्या यांना मातोश्रीवरुन भेट नाकारण्यात आली आहे.

हे देखील वाचा: दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ! ईशान्य मुंबईतून पियूष गोयल रिंगणात ?

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईतून सोमय्या यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळेच या मतदारसंघातील उमेदवारीवरून अद्याप शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झाले नाही. जागावाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही याची भाजपला देखील कल्पना आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार प्रयत्न केले. पण मातोश्रीवरून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सोमय्या यांनी भाजपमधील शिवसेनेच्या मित्रांकडून मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमय्या यांच्या फोन, मेसेज अशा कोणत्याही गोष्टींना मातोश्रीकडून प्रतिसाद दिला गेला नाही. यातच आता प्रवीण छोडा आणि पराग शहा यांनी ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या दोघांनी शिवसेनेला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत. प्रवीण छेडा यांनी गेल्याच आठवड्यात भाजपप्रवेश केल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे. छेडा यांनी बुधवारी (27 मार्च) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण या भेटीमुळे ईशान्य मुंबईच्या जागेसाठी इच्छुकांचं मातोश्रीवर लॉबिंग सुरू झाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येऊ लागल्या आहेत.

यामुळे शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांना विरोध

2017 मधील मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान तसंच यापूर्वीही किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेनेवर अनेकदा टक्केवारी घेण्यावरून टीका करण्यात आली होती. मुंबई महापालिकेत टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतेही काम दिले जात आहे. वांद्र्यांच्या साहेबांना टक्केवारी जाते, असा थेट आरोप मातोश्रीवर केल्याने किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिकांची तीव्र नाराजी आहे.

VIDEO: ट्रॅफीकमुळे पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं

First published: March 28, 2019, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading