मुंबईत दोन गटांमध्ये तुफान दगडफेक आणि हाणामारी, 6 जण जखमी

मुंबईत दोन गटांमध्ये तुफान दगडफेक आणि हाणामारी, 6 जण जखमी

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : चेंबुर परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा दोन गटांत तुफान वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी दोन गटांतील नागरिकांनी एकमेकांवर दगडफेकही केली त्यामध्ये अनेक गाड्यांचंही नुकसान झालं आहे. मुकुंदनगर कॉलनीतील मैदानात हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 6 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुकुंदनगर कॉलनीमध्ये जुन्या इमारतीमधील रहिवासी मैदानात आपल्या गाड्या पार्क करतात. तिथे नव्या इमारतीमधील सगळी मुलं मिळून क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना मुलांकडून गाडीच्या काचा फुटल्या आणि त्यावरून वादाला तोंड फुटले. हा वाद एवढा वाढला की दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि दगडफेक झाली. यावेळी तिथल्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. टॅक्सी आणि बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान एवढी हिंसा वाढली कशी असा सवालही उपस्थित केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मैदानात गाड्या पार्क करत असतानात तिथे मुलं खेळत होती. त्यातून हा वाद झाला. मुलांनी पार्किंगच्या ठिकाणी खेळू नये यासाठी कित्येक दिवसांपासून दोन गटांमध्ये धुसफूस सुरू होती. मात्र शुक्रवारी मुलांकडून गाडीची काच फुटल्यानं वादाला तोंड फुटलं आणि दोन गट भिडले. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संभाव्य माहिती आणि व्हिडिओच्या मदतीनं पोलिसांचा तपास सुरू आहे.

हेही वाचा-औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंची नवी खेळी, भाजपच्या पाठीराख्यालाच धरलं हाताशी

हेही वाचा-धावत्या रिक्षातून तरुणीने मारली उडी, रिक्षाचालक करत होता अश्लिल चाळे!

हेही वाचा-पती पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची चॉपरने हत्या, फरार आरोपी अखेर अट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2020 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading