मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: गार्डनमध्ये खेळता खेळता खड्ड्यात पडले, दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

Mumbai: गार्डनमध्ये खेळता खेळता खड्ड्यात पडले, दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

Mumbai: खेळता खेळता रस्त्यावरील खोदलेल्या खड्ड्यात पडले, दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

Mumbai: खेळता खेळता रस्त्यावरील खोदलेल्या खड्ड्यात पडले, दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

Mumbai two children drown after fall in dug: मुंबईत खेळता-खेळता दोन चिमुकले रस्त्यावरील खड्ड्यात पडले. दोघांचाही मृत्यू झाला.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 26 ऑक्टोबर : मुंबईतील दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून मृत्यू (two childrens drown) झाला आहे. मुंबईतील अँटॉप हिल (Antop Hill Mumbai) परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. ही दोन्ही मुलं गार्डनमध्ये खेळत असताना शेजारी खोदण्यात आलेल्या खड्डयात ते पडले आणि त्यानंतर बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय यशकुमार आणि 9 वर्षीय शिवम हे दोघेही सोमवारी (25 ऑक्टोबर 2021) अँटॉप हिल परिसरातील गार्डनमध्ये खेळत होते. त्याच भागात पाईपलाईन दुरुस्तीसाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. खेळता-खेळता शिवम आणि यशकुमार हे दोघेही त्या खड्ड्यात पडले. खड्डा हा खोल आणि पाण्याने भरलेला असल्याने दोन्ही चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

अँटॉप हिल परिसरात पाईपलाईनच्या दुरुस्तीकरीता खोदकाम करण्यात आले आहे. या खड्ड्यात पाणीही मोठ्या प्रमाणात साचले आहे. या खड्ड्याच्या शेजारी कुठल्याही प्रकारचं बॅरेकेड्स लावण्यात आलेले नाहीयेत आणि त्यामुळेच या दोन्ही चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे असा आरोप मृत मुलांच्या पालकांनी केला आहे.

दोन्ही मुलं खड्ड्यात पडल्याची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही मुलांना खड्ड्यातून बाहर काढण्यात आले आणि त्यानंतर सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता.

वाचा : दिवाळीपूर्वी मुंबईकरांना मिळाली Good News

या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि मृत मुलांच्या पालकांनी आक्रमक होत कारवाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व नागरिकांची समजूत काढत शांत केले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरचे काही फोटोज समोर आले आहेत त्यावरुन दिसत आहे की, या खड्ड्याच्या आसपास कुठलंही बॅरेकेड्स किंवा उपाययोजना केल्याचं दिसून येत नाहीये.

पाटण्यात माती आणायला गेलेले चिमुकले पडले खड्ड्यात, तिघांचा बुडून मृत्यू

खेळण्यासाठी माती आणायला गेलेल्या तीन मुलांना पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. गावात पाऊस पडून गेल्यानंतर खेळण्यासाठी ओली माती आणायला ही मुलं गेली होती. मात्र तिथेच असणाऱ्या एका भल्यामोठ्या खड्ड्याची त्यांना कल्पनाच आली नाही. तोल जाऊन या खड्ड्यात पडल्यामुळे तीन मुलांचा मृत्यू झाला.

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यतील बेनीपट्टी यभागात राहणारी तीन मुलं ओली माती भरून आणण्यासाठी गेली होती. तिथे एक मोठा खड्डा होता आणि त्यात पाणी भरलं होतं. मात्र सगळीकडे चिखल असल्यामुळे मुलांना तो खड्डा दिसला नाही. माती भरता भरता एक मुलगा त्यात पडला. खड्डा खोल असल्यामुळे तो त्यात बुडू लागला. ते पाहून इतर तिघे त्याला वाचवण्यासाठी खड्ड्यात उतरले आणि तेदेखील बुडू लागले.

मुलांच्या उंचीच्या मानाने हा खड्डा फारच खोल असल्यामुळे मुलांच्या नाकातोंडात पाखड्ड्यातून बाहेर पडण्याच्या झटापटीत एक मुलगा यशस्वी झाला आणि कसाबसा तो खड्ड्यातून बाहेर आला. बाहेर येताच त्याने आरडाओरडा करत शेजारपाजारच्या माणसांना हाका मारल्या. त्याचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूची माणसं धावत आली आणि त्यांनी मुलांना खड्ड्यातून बाहेर काढलं. खड्ड्यातून मुलांना बाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.

First published:

Tags: Mumbai