शेजारच्या व्यक्तीवर ठेवला पतीपेक्षाही जास्त विश्वास.. त्यानेच केला अनेकदा बलात्कार

शेजारच्या व्यक्तीवर ठेवला पतीपेक्षाही जास्त विश्वास.. त्यानेच केला अनेकदा बलात्कार

एका 32 वर्षीय विवाहितेला शेजारच्या व्यक्तीवर पतीपेक्षाही जास्त विश्वास ठेवणे चांगलेच महागात पडले आहे.

  • Share this:

मुंबई,18 सप्टेंबर:एका 32 वर्षीय विवाहितेला शेजारच्या व्यक्तीवर पतीपेक्षाही जास्त विश्वास ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. पतीने वारंवार समजावूनही महिलेने गैरपुरुषासोबत जवळीकता वाढवली. अखेर जे व्हायचं नव्हतं तेच झालं. विवाहितेवर त्या नराधमाने अनेकदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पीडितेने आरोपी अमजद खान (वय-30) याच्याशी फ्रेंडशिप केली होती. पीडिता पतीला खोटे सांगून आरोपीसोबत म्युव्ही पाहाण्यासाठी तसेच फिरायला जात होती. याचा फायदा घेत अमजदने तिच्या इच्छेविरोधात जाऊन तिच्यावर अनेकदा शरीर संबंध प्रस्थापित केले. अनेक महिने हा प्रकार सुरु होता.

अमजदने पीडितेचा बनवला अश्लील व्हिडिओ...

अमजद सुरूवातीपासूनच पीडितेवर डोळा ठेऊन होता. संधी साधून त्याने महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला होता. त्यावरून तो पीडितेला ब्लॅकमेल करत होता. एके दिवशी अमजदने महिलेला तिच्या अश्लील व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवला. तो पाहून महिलेला धक्का बसला. त्यानंतर अमजदने महिलेवर ब्लॅकमेल करून वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा बलात्कार केला.

Loading...

मित्राकडूनही करवून घेतला बलात्कार..

अमजदची हैवानियता इथेच थांबली नाही तर त्याने पीडितेला त्याचा 43 वर्षीय मित्र नूर नजीर शेखच्या हवाले केले. नूर यानेही महिलेचे शारीरिक शोषण केले. नंतर दोघांनी पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा बलात्कार केला. अखेर या अत्याचाराला कंटाळून महिलेने पतीकडे आपबिती कथन केली. पत्नीची व्यथा समजून घेत पतीने हिम्मत दाखवून दोन्ही नराधमाविरुद्ध गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या घटनेची गंभीर घेत आरोपी अमजद आणि नूर नजीर शेखला अटक केली आहे. सामूहिक दुष्कर्म, अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन्ही नराधमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, का तर म्हणे पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2019 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...