तांत्रिक बिघाडामुळे कुर्ला ते सायन दरम्यानची वाहतूक ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे कुर्ला ते सायन दरम्यानची वाहतूक ठप्प

काही तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे गेल्या पाऊण तासापासून बंद आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : काही तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे गेल्या पाऊण तासापासून बंद आहे. यात कुर्ला ते सायन दरम्यान मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होतायत. सकाळची वेळ असल्यामुळे मोठ्या संख्येनं ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी रेल्वे स्थानकावर झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी वाढत असल्यामुळे तांत्रिक बिघाड लवकरात लवकर ठीक करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कुर्ला ते सायन दरम्यानच्या रुळावर हा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. इतर रेल्वेदेखील उशिराने धावत आहेत. मुंबईच्या दिशेने अनेक ट्रेन या विद्याविहारपासून पाठवण्यात आल्या आहेत. बिघाड दुरूस्त होईपर्यंत काही वेळ त्रास असं आवाहनही रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

मराठा मोर्चाच्या तोडफोडीमुळे परतीच्या मार्गी निघालेला वारकरी खोळंबला

मराठा मोर्चाकडून 'ही' शहरं वगळता आज महाराष्ट्र बंदची हाक

दरम्यान, लोअर परेल स्थानकावरुन जाणारा रोड ओव्हर ब्रीज आजपासून वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. धोकादायक असल्याचं कारण रेल्वे आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडून देण्यात येतंय. अंधेरी रेल्वे पुल दुर्घटने नंतर पश्चिम रेल्वे, आयआयटी आणि महानगरपालिकेनं एक सर्वे केला, ज्यात हा पूल धोकादायक असल्याचं पुढे आलं. हा पुल बंद केल्यानंतर करी रोड, डिलाईड रोड आणि एलफिन्स्टन रोड अर्थात (प्रभादेवी) पुलांवर वाहतूकीची कोंडी होणार हे नक्की.

हेही वाचा...

VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही !

वजन कमी करायचंय; मग हे जाणून घ्या...

बापरे!,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...

First published: July 24, 2018, 8:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading