S M L

'तो' रुळावर झोपला, रेल्वे गेली अन् 'तो' उठून चालू लागला !

पुढे काय झालं हे पाहण्याची कुणाचीही हिम्मत नव्हती...मात्र सर्वांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2018 11:58 PM IST

'तो' रुळावर झोपला, रेल्वे गेली अन् 'तो' उठून चालू लागला !

29 जानेवारी : कुर्ला रेल्वे स्थानकावर एक तरूण आत्महत्या करण्यासाठी रुळावर उतरला..तेवढ्यात एक एक्स्प्रेस रुळावर आली.. या घटनेच्यावेळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी गच्च डोळे मिटले.. ट्रेन निघून गेली... पुढे काय झालं हे पाहण्याची कुणाचीही हिम्मत नव्हती...मात्र सर्वांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण रेल्वे रुळावर झोपलेला तरूण सुखरूप होता.त्याच्या अंगाला साधं खरचटलंही नव्हतं.

कुर्ल्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर रविवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास रेल्वेतच काम करणारा विश्वास बनसोडे हा काही कारणास्तव आत्महत्या करण्यासाठी ट्रेन समोर उडी मारतो पण सुदैवाने त्याचा जीव वाचतो. तो दोन्ही रुळाच्यामध्ये उभा झोपल्याने त्याच्या अंगावरून ही ट्रेन अलगद निघून जाते. विश्वास हा इगतपुरी येथे रेल्वेच्याच इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये काम करतो. प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या आरपीएफचा जवान त्याला घेऊन आपल्या वरिष्ठांकडे घेऊन जातो. वरिष्ठ विश्वासच्या कुटुंबियांना बोलावून त्याला समज देतात आणि त्याचा कुटुंबियांकडे सोपवतात. विश्वास मानसिक दृष्ट्या खचलेला असल्याने तसंच त्याला दारूचे व्यसनही असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी आरपीएफ पोलिसांना सांगितल्याचं कुर्ल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अत्री यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 11:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close