मुंबई, 19 फेब्रुवारी : मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये (Mumbai Train Accident) चढताना आणि उतरताना होणाऱ्या अपघातात सातत्याने वाढ होत आहे. ही घटना मुंबईतील बोरीवली रेल्वे स्टेशनवर (Borivali Railway Station) घडल्याचं समोर आलं आहे. येथे चालत्या ट्रेनमधून उतरत असताना रेल्वे कर्मचारी प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला. आणि ट्रेनच्या चाकाखाली येऊन त्याचं शरीर छिन्नविछिन्न झालं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बोरीवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सायंकाळी बोरीवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबरवर घडली आहे. मृत व्यक्ती रेल्वेचा कर्मचारी आहे आणि वांद्र्याहून निजामुद्दीन एक्सप्रेस ट्रेन पकडून बोरीवलीला जात होता. या ट्रेनचा स्टॉप येथे नव्हता, मात्र चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला. हे ही वाचा-घाईत रेल्वे ट्रॅक ओलांडणं दुचाकीस्वाराला भोवलं; दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर, VIDEO या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, प्लॅटफॉर्मवर पहिलं पाऊल ठेवताच तो डगमगला आणि ट्रेनच्या खाली पडला. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅप जास्त होता आणि त्याला स्वत:ला सांभाळता आलं नाही आणि तो ट्रेनच्या चाकाखाली गेला. दरवर्षी मुंबईत अशा अपघातात अनेकांचा मृत्यू.. 2018 मध्ये मुंबईतील 2981 लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. आणि 3349 लोक जखमी झाले. अपघातात जीव गेलेल्यांमध्ये 363 महिला आहेत. सर्वाधित प्रवाशांचा 1619 रेल्वे ट्रॅक पार करताना मृत्यू झाला आहे. 2017 मध्ये मुंबई रेल्वे अपघातात एकूण 3014 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 3345 जखमी झाले होते. मध्य रेल्वेत झालेल्या अपघातात 1933 प्रवाशआंचा मृत्यू झाला. तर 1920 जखमी झाले. तर पश्चिम रेल्वेत 1048 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आणि 1429 जखमी झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Shocking video viral, Train accident