Home /News /mumbai /

मोठी बातमी! दादर रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसचे तीन डब्बे रेल्वे रुळावरुन घसरले

मोठी बातमी! दादर रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसचे तीन डब्बे रेल्वे रुळावरुन घसरले

मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाजवळ आज रात्री पावणे दहावाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली आहे.

मुंबई, 15 एप्रिल : मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाजवळ आज रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास एक अनपेक्षित घटना घडली. दोन ट्रेन अचानक एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या. दोन्ही ट्रेन धिम्या गतीत होत्या. तसेच चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. पण या दुर्घटनेत पॉन्डिचेरी एक्सप्रेसचे तीन डब्बे रुळावरुन खाली घसरले. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचं चित्र आहे. रेल्वे रुळाखाली घसरलेले डब्बे पुन्हा कधी रुळावर घेऊन ती ट्रेन बाजूला करणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांधा बदलला न गेल्यामुळे संबंधित दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे गंभीर मानवी चूक असल्याचं मानलं जात आहे. दुर्घटनेत दोन ट्रेन एकमेकांना घासल्या गेल्या आहेत. या दुर्घटनेत काहींना दुखापत झाल्याची देखील माहिती आता समोर येऊ लागली आहे. तसेच चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसचे तीन डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरले. संबंधित घटनेनंतर दादर रेल्वे स्टेशनवरून प्लॅटफॉर्म क्र 3, 4 आणि 6 वरुन जाणाऱ्या लोकल आणि बाहेरगावी जाणाऱ्या सर्व ट्रेन्सची वाहतूक थांबवण्यात आली आहे. (घरात वाद झाला अन् बापाने घरच्यांवरच केला गोळीबार, ठाण्यातील धक्कादायक घटना) मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाजवळ संबंधित घटना घडली आहे. सुरुवातीला रेल्वे सिग्नलमुळे संबंधित दुर्घटना घडल्याचा अंदाज बांधला जात होता. पण नंतर मानवी चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एक्सप्रेसचा सांधा न बदलल्या गेल्यामुळे हा अपघात घडला आहे. गदक एक्सप्रेस आण पॉन्डेचेरी एक्सप्रेस या एकाच ट्रॅकवर आल्या. तसेच या ट्रेन एकमेकांना घासल्या गेल्याची माहिती समोर आली. चालकाने प्रसंगावधान साधून इमरजन्सी ब्रेक दाबला. त्यामुळे पॉन्डेचेरी एक्सप्रेसचे तीन डब्बे रेल्वे रुळाखाली घसरले. या दुर्घटनेची किती मोठी हानी झालीय याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. दुसरीकडे संबंधित घटनेमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. मुंबईहून मध्य रेल्वेच्या मार्गाने अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या जातात. तसेच मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल दररोज लाखो प्रवाशांना घेऊन मध्य रेल्वेच्या मार्गाने प्रवास करते. मध्य रेल्वेच्या मार्गाला कसारा, खोपोवलीपर्यंत लोकल जाते. या दुर्घटनेमुळे दादरहून डाऊनला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांची गैरसोय आता कधी दूर होईल, याबाबतही रेल्वे प्रशासनाकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Train accident

पुढील बातम्या