न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : उर्मट रिक्षाचालकांविरूद्ध वाहतूक पोलीस करणार छुपी कारवाई

न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : उर्मट रिक्षाचालकांविरूद्ध वाहतूक पोलीस करणार छुपी कारवाई

रिक्षाचालकाच्या भाडं नाकारणं, उर्मटपणा याचा मुंबईकरांना नेहमीच अनुभव येतो. मात्र आता भाडं नाकरल्यास रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार आहे

  • Share this:

29 एप्निल:  न्यूज १८ लोकमतच्या बातमीनंतर  उर्मटपणा  रिक्षाचालकांना आता महागात पडणार आहे. भाडं नाकारणाऱ्या  रिक्षाचालकांविरूद्ध पोलीसांनी आता छुपी कारवाई हाती घेतली आहे.

रिक्षाचालकाच्या भाडं नाकारणं, उर्मटपणा याचा मुंबईकरांना नेहमीच अनुभव येतो. मात्र आता भाडं नाकरल्यास रिक्षाचालकांवर कारवाई  केली जाणार आहे. एरव्ही गणवेशातील वाहतूक विभागाचे कर्मचारी बघितल्यावर  रिक्षाचालक सावध  होतात. त्यामुळे कारवाई करण्यासाठी आता नवा शिरस्ता वाहतूक पोलिसांनी हाती घेतला आहे.   आता वाहतूक शाखेचे पोलीस  कर्मचारी हे सर्वसामान्य प्रवासी बनून कारवाई करतील.  फक्त दोनच  दिवसांपूर्वी न्यूज१८ लोकमतनं भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांच्या  मनमानी कारभाराला वाचा फोडली होती.  यानंतर छुप्या कारवाईची मोहिम वाहतूक विभागासा हाती घ्यावी लागली आहे.

आता या छुप्या कारवाईचा काही परिणाम होतो का  आणि रिक्षाचालक उद्दामपणा सोडून सामान्य प्रवाशांना योग्य प्रकारे वागणूक देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2018 03:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading