राजेंद्र सोनवणे यांनी भररस्त्यात सर्व बाजूंनी वाहन धावत त्या दिव्यांग व्यक्तीला रस्ता पार करत, रेल्वे स्टेशनजवळ सोडलं. ह्याच वेळी सिग्नसवर उभ्या असलेल्या गाडीतून एका व्यक्तीने सर्व सामान्य माणसाला केलेली मदत मोबाईलमध्ये रेकॅार्ड केली. आज हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'मी कोणाला तरी मदत केली हे मला मोठ समाधान आहे. मुंबई पोलीस कायम तुमच्या सेवेत आहे, हे मला सांगायचं आहे' असं राजेंद्र सोनवणे यांनी सांगितलं. हा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला गेला होता. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमची #MrMumbaiPolice संपूर्ण यूनिर्सचे हृदय जिंकत आहे. त्यात पुढे सांगितले आहे की, एचसी राजेंद्र सोनावणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रोडवर एका दिव्यांगाला रस्ता पार करून देताना दिसत आहे. ही क्लिप आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केली आहे. त्यांनी त्याला कॅप्शन देताना ते म्हणाले की, 'दयाळूपणाचे एक छोटेसे उदाहरण'. हा व्हिडीओ आतापर्यंत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.Our #MrMumbaiPolice, winning hearts across the 'universe'! HC Rajendra Sonawane spotted at CSMT road doing what we do best - lending a helping hand to those in need!#MumbaiPoliceForAll pic.twitter.com/PTbCJCQXa1
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 13, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai police, मुंबई