S M L

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजचा संप मागे

औद्यागिक न्यायालयात 5 मार्चला खासगी बस खरेदीच्या निर्णयावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे बेस्ट संघटनेनं संप मागे घेतलाय.

Sachin Salve | Updated On: Feb 14, 2018 08:54 PM IST

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजचा संप मागे

14 फेब्रुवारी : विविध मांगण्यासाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतलाय. औद्यागिक न्यायालयात 5 मार्चला खासगी बस खरेदीच्या निर्णयावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे बेस्ट संघटनेनं संप मागे घेतलाय.

विविध बेस्ट कर्मचारी संघटनांनी आज मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला होता. दुपारी संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी चर्चा केली. मात्र, यातून तोडगा निघू शकला नाही. मात्र, ५ मार्च रोजी खासगी बस घेण्याच्या निर्णयावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे बेस्ट कर्माचारी संघटनांनी तृर्तास संप मागे घेतलाय.

दरम्यान, बेस्ट उपक्रमासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून घेण्यास असमर्थ ठरलेल्या सत्ताधारी शिवसेनेने ४५० बसगाड्या भाड्याने घेण्याच्या प्रस्तावाला मान तुकवलीय. यामुळे बेस्ट कामगार कृती समितीने  पुकारलेल्या संपात सामील होण्यास बेस्ट कामगार सेनेच्या नेत्यांनी नकार दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 08:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close