मुंबई- नागपूर प्रवास आता सहा तासांत- मुख्यमंत्री

मुंबई ते नागपूर असा जवळपास ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 01:56 PM IST

मुंबई- नागपूर प्रवास आता सहा तासांत- मुख्यमंत्री

मुंबई, 16 जुलैः मुंबई- नागपूर हा 700 किलोमीटरचा प्रवास अवघ्या सहा तासांमध्ये पार करता येणार आहे. मुंबई- नागपूर समृद्धी एक्सप्रेस वेसह हायस्पीड ट्रेनही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई ते नागपूर असा जवळपास ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते नितीन गडकरी यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांपासून जमीन अधिग्रहणाच्या वादावरून समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. पाच भागांमध्ये हा ७०० किलोमीटरचा महामार्ग तयार होणार आहे.

आतापर्यंत 93 टक्क्यांहून अधिक जमीन ही प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोल असतील. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जवळपास १५०० ते २००० रुपये केवळ टोलसाठी द्यावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचाः 

...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम

'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...