मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /गेटवे ते अलिबाग जलवाहतूक तीन महिने बंद, तरीही करता येईल असा प्रवास

गेटवे ते अलिबाग जलवाहतूक तीन महिने बंद, तरीही करता येईल असा प्रवास

मुंबई ते अलिबाग जलवाहतूक तीन महिने बंद

मुंबई ते अलिबाग जलवाहतूक तीन महिने बंद

Gateway To Mandwa : मेरी टाइम विभागाने जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्र देत वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई, 26 मे : मांडवा ते गेटवे अशी जलवाहतूक तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती मेरी टाइम विभागाने दिली आहे. याबाबत मेरी टाइम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्रही देण्यात आलं आहे. 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ही प्रवासी वाहतूक बंद राहील. त्यामुळे आता मुंबई ते अलिबाग ये-जा करण्यासाठी रस्त्याने प्रवास करावा लागेल.

मांडवा ते गेटवे जलवाहतूक बंद होणार असली तरी मांडवा ते भाऊचा धक्का या दरम्यान रो रो बोट सेवा सुरू राहणार आहे. यामुळे प्रवाशांना काहिसा दिलासा मिळेल. मांडवा ते गेटवे जलवाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची बचत होते. रस्ते मार्गे मुंबईत येण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागतो. तर जलवाहतुकीमुळे अवघ्या तासाभरात मुंबईत पोहोचता येता.

मुंबईकरांनो, घरा बाहेर पडण्यापूर्वी घ्यावीच लागणार काळजी, पाहा आज काय असेल तापमानाची स्थिती

पावसाळा सुरू होण्याआधी आठ दिवस अगोदर जून महिन्यात जलवाहतूक सेवा बंद केली जाते. त्यानुसारच मेरी टाइम विभागाने जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्र देत वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. अलिबागला जाण्यासाठी या जलवाहतुकीची मोठ्या प्रमाणावर मदत होते. अनेक कंपन्या जलवाहतुकीची सेवा पुरवतात. त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे.

26 मे पासून बंद करण्यात येणारी ही सेवा सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. या काळात रो-रो बोट सेवा सुरू राहील. पण ही सेवाही हवामान कसे असेल त्यानुसार सुरू असणार आहे. त्यामुळे आता पुढचे तीन महिने प्रवाशांना जलवाहतूकीऐवजी रस्त्याचा पर्याय असणार आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai